घरताज्या घडामोडी'लव्ह- सेक्स' चॅट करत महिलेने २ तरूणांना ओढलं आपल्या जाळ्यात आणि...

‘लव्ह- सेक्स’ चॅट करत महिलेने २ तरूणांना ओढलं आपल्या जाळ्यात आणि…

Subscribe

मालविकाने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

एका ४४ वर्षीय महिलेने लग्नाच्या बहाण्याने अमेरिकेतील एका एनआरआयला तब्बल ६५ लाखांचा गंडा घातला आहे. या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या महिलेला २७ मे ला अटक करण्यात आली. याच महिलेविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. हैद्राबादमधील आयटी इंजिनिअप के.पी.एच.बी. पोलिसात या महिलेविरोधात तक्रार नोंदविली आहे. मालविकाने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मालविका देवती असं या महिलेचं नाव आहे.

व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर मालविकाने लव्ह आणि सेक्स चॅट करत एनआरआय तरूणाला आपल्या जाळ्यात ओढलं. असा दावा ३३ वर्षीय इंजिनिअर तरुणाने केला आहे. या तरूणाने या महिलेला पैसे देण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज काढले होते. त्याचप्रमाणे त्याने काटकसरही सुरू केली. २७ मेला पोलिसांनी मालविका आणि तिचा मुलगा प्रणव ललित गोपाळ देवाथी यांना अमेरिकेतील एनआरआय अभियंत्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या महिलेने बनावट प्रोफाइल वापरुन लग्नाचे आमिष दाखवले आणि तरुणाची फसवणूक केली.

- Advertisement -

तर दुसरीकडे हैदराबादमधील तरुणाने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने केलेल्या तक्रारीनुसार मालवीकाने अमेरिकेतील अनु पल्लवी या डॉक्टरच्या बनावट नावाचा प्रोफाइल वापरला आहे. तिच्या कुटुंबाचे राजकीय संबंध असल्याने तिला बँक खाते वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे सांगत मालविकाने या हैद्राबादमधील तरूणाला फसवले.

मालविकाने या तरूणांना सांगितले होते की, तिच्याकडे बरीच मालमत्ता आहे आणि मात्र तिची आई सर्व संपत्ती तिच्याकडे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर लढा देण्यासाठी तिला पैशांची गरज आहे. त्या एनआरआयला मालविकाने केलेली थाप पटली. आणि त्यांनी ६५ लाख रुपये पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तिच्याशी संपर्क होत नसल्याने आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनापासून प्राणांच्या बचावासाठी लसीचे संशोधन सुरू…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -