घरCORONA UPDATEखासगी हॉस्पिटलच्या बेड आणि बिलाविषयी 'या' नंबरवर करा तक्रार!

खासगी हॉस्पिटलच्या बेड आणि बिलाविषयी ‘या’ नंबरवर करा तक्रार!

Subscribe

मागील तीन महिन्यात मुंबईत कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक झालेले रूग्ण आणि सुमारे पंधराशेहून मृत्यूमुखी पडलेले मुंबईकर यामुळे महापालिकेच्या सोयीसुविधा आणि अंमलबजावणीबाबत सर्वत्र टीका होत होती. अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दोन दिवसांपूर्वी खासगी रूग्णालयांना चाप लावण्यासाठी पाच सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला. यावर एक पाऊल पुढे जात मुंबईचे महापालिका आयुक्ता इक्बाल चहल यांनी प्रत्येक खासगी रूग्णालयावर सनदी अधिकाऱ्यांसोबत पालिकेचे दोन ऑडिटर नेमले आहेत. यामुळे आता राज्यसरकारने आणि मुंबई महापालिकेने नियमित केलेल दर आणि पीपीई किटच्या किंमतीच्या वर जर कोणी रूग्णांकडून जास्त दर आकारले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या रूग्णाच्या नातेवाईकांना आपले बिल राज्यसरकार आणि मुंबई महापालिकेने निश्चत केलेल्या दरापेक्षा जर कोणी जास्त आकारणी करत असेल तर पालिकेच्या ऑडिटरशी तात्काळ संपर्क साधा असे आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपलं महानगरशी बोलताना केले.

तुम्ही करू शकता तक्ररार यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा

- Advertisement -

- Advertisement -

 

 

 

खासगी रुग्णालयात समन्वयासाठी नेमलेले सनदी अधिकारी व लेखा परिक्षक अधिकारी

मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, कॉनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास ईमेल  पत्यावर करू शकता.

[email protected]

या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरिक्षक अधिकारी :

संजय जाधव, मोहन पुकळे, प्रदीप वाघ,  विजय घायवंत, राजेश शेट्टीगर, विजय नलावडे, सोमनाथ मदगे, मंदार शेळके,अंशीराम गोरे, सुदय हरियाण, राजेश गंगावणे, संदीप साळवी, शैलेश करंदीकर,नवलसिंग नाईक, राहुल गोपनर

अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे.

 ईमेल :[email protected]

या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरिक्षक अधिकारी :  

अनिल हरवंडे, अनंत ठाकूर,  संजय पिंगळे, नितीन बायेस, सुजीत पाटणकर, स्वप्नील उदरे, शशिकांत टिटकारे, सागर सावडेकर,श्रीकृष्ण चांदोरकर, श्रीकांत बाटेकर,अनिरुध्द येवले, निलेश अरडे,केदार बागडे

राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ई-मेल :- [email protected]

या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरिक्षक अधिकारी :  शंकर गंगासरे,अवधुत खडपे, अविनाश गावडे, निलेश पागधरे, गणेश बुध्दवंत, उदय राजपूत, सागर चव्हाण, गितेश हळदणकर, विल्यम कोरेला,  अजय पांडे, संजय सराफ,  महिंद्र गायकवाड, प्रशांत देशमुख,  दिगंबर शिंदे

सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 ई-मेल : [email protected]

या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरिक्षक अधिकारी :  दिपक घारगे, जहिरुद्दीन काझी, प्रसाद गुप्ता,  देवेंद्र बोले, अनिल केणी, संदीप वरवडेकर, राजेंद्र पवार, प्रकाश परमार,सुनील मालवाडकर, विठ्ठल भांगारे,  प्रविण पाटील, दत्तात्रय ठाकूर, सुनील खर्चे, अजयकुमार खाचणे,

प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सुचना करावयाची असल्यास त्यासाठीचा

ईमेल: [email protected]

या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरिक्षक अधिकारी :  संजय रणधीर,  विलास सरोदे,  अमित माने,  सचिन पवार,   दिपक मालपाठक, श्रीराम चौधरी, रामचंद्र खोबरेकर,  सुयोग कुलकर्णी, राजेंद्रकुमार भिमकर, अरविंदबाबू गायकवाड, योगेश महाजन, मिलिंद मोर्ये


हे ही वाचा – खासगी हॉस्पिटलवर पालिकेचे ऑडिटर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -