घरताज्या घडामोडीCorona: महापालिकेच्या कोरोना लढ्याला यश; मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर २५ दिवसांवर

Corona: महापालिकेच्या कोरोना लढ्याला यश; मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर २५ दिवसांवर

Subscribe

मुंबई महापालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांमुळे पालिकेला यश येत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत असताना मुंबईत तब्बल २५ दिवसांनी रुग्ण दुप्पट होत असल्याची नोंद झाली आहे. मृत्यूदरही देशाच्या बरोबरीने ३ टक्के आणि डिस्चार्ज रेट ४४ टक्के असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

‘चेसिंग द व्हायरस’ ही मोहीम पालिकेने सुरू केली असून तिला यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांचे विलगीकरण करण्यात येत आहे. रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. तसेच विलगीकरण केंद्रात लाफिंग थेरपी, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या सहायक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त खाटा उपलब्ध आहेत. १० हजार ४०० खाटा पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.

- Advertisement -

यामध्ये पुढील दहा दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या २० दिवसांत एकही डायलेसिस रूग्णाचा मृत्यू झाला नाही अशी माहितीही पालिका आयुक्तांनी दिली. कोरोना लढयात लवकरच यशस्वी होऊ असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.

मृत्यूची आकडेवारी ४८ तासात वेबसाईटवर

कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्या विषयीची आकडेवारी व तपशिल हा मृत्यू झाल्यापासून ४८ तासांच्या आत आणि निर्धारित नमुन्यात ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ अर्थात ‘आयसीएमआर’ च्या वेबसाईटवर अपलोड करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आयुक्तांनी यांनी दिले आहेत. त्यामुळे या साथीवर पुढील उपाययोजना करणे आयसीएमआरला शक्य होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -