घरताज्या घडामोडीPhotos: सुशांतची ती ५० स्वप्नांची 'बकेट लिस्ट' अपूर्णच राहिली!

Photos: सुशांतची ती ५० स्वप्नांची ‘बकेट लिस्ट’ अपूर्णच राहिली!

Subscribe

गेल्या वर्षी सुशांतने ५० गोष्टींची एक 'ड्रीम लिस्ट' तयार केली होती. यात त्याने जीवनात एकदा तरी या सर्व गोष्टी करायच्या अशी स्वप्न त्याने पाहिली होती. त्याने सोशल मीडिया अकाउंटवरही ही लिस्ट शेअर केली होती.

मालिका आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या मालिका व सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) याने रविवारी सकाळी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली नाही, त्यामुळे सुशांतने इतक्या टोकाची भूमिका का घेतली याचा उलगडा होऊ शकला नाही. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

sushant sigh rajput

मूळचा बिहारचा राहणाऱ्या सुशांतने बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान तयार केलं होतं. त्याची स्वप्नही मोठी होती. गेल्या वर्षी सुशांतने ५० गोष्टींची एक ‘ड्रीम लिस्ट’ तयार केली होती. यात त्याने जीवनात एकदा तरी या सर्व गोष्टी करायच्या अशी स्वप्न त्याने पाहिली होती. त्याने सोशल मीडिया अकाउंटवरही ही लिस्ट शेअर केली होती.

- Advertisement -

सुशांतने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सुशांतने आपली बकेट लिस्ट तयार केली होती. यातली काही स्वप्न त्याने पूर्ण केली होती. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही त्याने शेअर केले होते. मात्र काही दिवसांनी त्याने ही पोस्ट डिलीट केली.

- Advertisement -

५० स्वप्नांची बकेट लिस्ट

नेत्रहिन मुलांना कॉम्प्यूटर कोडिंग शिकवणं, सहा आठवड्यात सिक्स पॅक अॅब बनवणं, IRONMAN triathlon आणि डिझनीलँड, त्याला स्वप्नांमध्ये विमान उडवायचं होतं. त्याचबरोबर त्याला ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सेल्फ- डिफेन्सही शिकवायचं होतं, डायविंग, तीरंदाजी, अशी अनेक मोठी स्वप्न सुशांतसिंह राजपूतने बघितली होती.

सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं होतं. याशिवाय पोलिसांनाही सुशांतच्या घरात डिप्रेशनवर सुरू असलेल्या ट्रीटमेन्टची फाइल मिळाली.


हे ही वाचा – विलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतवर होणार अंत्यसंस्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -