घरCORONA UPDATECorona Live Update: महाराष्ट्रात २७८६ नवे करोना रुग्ण, तर १७८ जणांचा मृत्यू

Corona Live Update: महाराष्ट्रात २७८६ नवे करोना रुग्ण, तर १७८ जणांचा मृत्यू

Subscribe

पुणे : दिवसभरात २३४ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात दिवसभरात २३४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ८९० वर गेली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनाचे १,०६६ नवे रुग्ण

मुंबईमध्ये सोमवारी १ हजार ०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २ हजार २४८ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. सोमवारी मुंबईमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २५ जण हे ६० वर्षांवरील, तर ३० जण हे ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

- Advertisement -

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २ हजार ७८६ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता १ लाख १० हजार ७४४ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५६ हजार ४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४ हजार १२८ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.


अंबरनाथमध्ये रविवारी कोरोनाचे ६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर सोमवारीही ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या १२६ ने वाढली आहे. सोमवारी अंबरनाथ पश्चिम भागात ५८ तर पूर्व भागात ६ असे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. ५ ते १४ वयोगटातील ८ मुलामुलींचाही त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत अंबरनाथमध्ये कोरोनाचे ७४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३१० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ४१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कल्याण-डोंबिवली कोरोनाच्या विळख्यात

कल्याण- डोंबिवली शहराला कोरोनाचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसात केडीएमसी क्षेत्रात तब्बल १२७४ रूग्ण वाढले असून ३१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाच्या तोंडावर कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता व्यक्त करणारी आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी केडीएमसी क्षेत्रात सोमवारी १३१ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत, तर २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा हा २३०७ वर पोहचला आहे. गेल्या चार दिवसांपासून रूग्णांचा सरासरी आकडा हा शंभरवर पोहचला आहे. (सविस्तर वाचा)


नाशिकमध्ये दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह; ८ बाधितांचा मृत्यू

नाशिकl जिल्हा प्रशासनास सोमवारी (दि.१५) दिवसभरात ८१ नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक शहरातील ६५, मालेगाव ७, जिल्ह्याबाहेरील एक आणि नाशिक ग्रामीणमधील ५ रूग्णांचा समावेश आहे. नाशिक शहर व जिल्ह्यांत दोन दिवसांत 8 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात खोडेनगर, महादेववाडी सातपूर, बुरुडगल्ली, पारिजातनगर, नाईकवाडीपुरा, खडकाळी, वडाळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २ हजार ६२ वर पोहोचली आहे. (सविस्तर वाचा)


मागील अनेक दिवसांपासून दादर, धारावी आणि माहिम या विभागातील जी-उत्तर प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत असतानाच पुन्हा एकदा या विभागात संसर्गाचे प्रमाण वाढू लागले. या जी-उत्तर विभागात दिवसभरात ८३ रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये धारावी व माहिममध्ये प्रत्येकी २५ आणि दादरमध्ये ३३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने या विभागाची चिंता वाढलेली आहे. (सविस्तर वाचा)


जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ७ हजार ४१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद झाली आहे. तर सध्या देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ७९७ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर रिकव्हरी रेट ५१.०८ टक्के इतका झाला आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना विषाणूने जगात अक्षरश: कहर केला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात चार वेळा लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, असे असताना देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली नाही. तर याउलट दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी देशातील काही शहरात येत्या १९ जूनपासून लॉकडाऊन जाहिर केले जाणार आहे. (सविस्तर वाचा)


जगात आणि देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान चेन्नईमध्ये एका वैज्ञानिकाने सूर्यग्रहण आणि कोरोना विषाणू यांच्यात संबंध असल्याचा दावा केला आहे. न्यूक्लिअर आणि अर्थ वैज्ञानिक डॉ. केएल सुंदर कृष्णा यांनी असा दावा केला आहे की, ‘मागच्या वर्षी २६ डिसेंबरला लागलेल्या सूर्यग्रहणाचा संबंध थेट कोरोना विषाणूशी आहे. येत्या २१ जून रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे कोरोना विषाणूचा नाश होईल.’ याबाबतचे वृत्त दैनिक जागरण वृत्तसंस्थेने दिले आहे. (सविस्तर वाचा)


जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना आजाराशी लढत असताना आज वीर मरण आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे २७ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.


सीआरपीएफमधील २९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ६२० सीआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १८० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच ४२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४ सीआरपीएफच्या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला सीआरपीएफने दिली आहे.


आज औरंगाबादमध्ये कोरोनाचे ५० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार पार झाला आहे. तसेच आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात गेल्या २४ तासांत ३२५ जणांचा मृत्यू झाला असून ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचला असून १ लाख ५३ हजार १०५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच देशात आतापर्यंत ९ हजार ५२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ६० हजार ७९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


वंदे भारत मिशनच्या टप्प्यात श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणले जाणार आहे. १२०२ भारतीयांना परत आणण्यासाठी कोलंबो विमानतळावर एअर इंडियाचे विमान पोहोचले आहे.


जगातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९ लाख ८२ हजार ८१७वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ४ लाख ३५ हजार १६६ झाला आहे. तसेच आतापर्यंत जगात ३८ लाख ९८ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात काल कोरोनाचे ३,३९० नवे रुग्ण, १२० जणांचा मृत्यू!

राज्यात काल ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ९७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ५३ हजार ०१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -