घरCORONA UPDATECoronaVirus : जेवढे जास्त लोक मास्क परिधान करतील तेवढ्या लवकर संसर्ग कमी...

CoronaVirus : जेवढे जास्त लोक मास्क परिधान करतील तेवढ्या लवकर संसर्ग कमी होईल!

Subscribe

कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात आता मास्क सर्वात महत्वाचे शस्त्र बनले आहे.

चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जनतेला मास्क वापरण्यास विरोध दर्शविला. डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक डॉ. मिशेल रायन म्हणाले की, मास्क आपले संरक्षण हवे तसे करत नाही. इंग्लंडमधील तज्ज्ञांनीही अशाच काही गोष्टींचा पुनरुच्चार केला होता, परंतु त्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी सरकारला असे सांगितले की, सार्वजनिक वाहतूक, दुकाने आणि गर्दीच्या वातावरणासारख्या शारीरिक अंतर ठेवणे कठीण आहे. तिथे सामान्य लोकांनी व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरण्यास प्रोत्साहित करावे. कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात आता मास्क सर्वात महत्वाचे शस्त्र बनले आहे. अनेक संशोधकांनी याची पुष्टी केली आहे.

प्रत्येकासाठी मास्क घालणे का आवश्यक आहे यावर विविध अभ्यासांनी सांगितले की, कोविड -१९ पासून अमेरिकेतील मृत्यू जपानच्या तुलनेत ५० पटीने जास्त होते. जपानमधील मेट्रो व व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आले होते. आता प्रश्न विचारला जात आहे की, ते फक्त जपानी लोक मास्क घालतात म्हणूनच का? अलीकडील अभ्यासानुसार असे सूचित केले गेले की, मास्क व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखतात. अमेरिकेचे संगणक शास्त्रज्ञ डी काई यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, जर ८० टक्के लोक मास्क घालतात तर संक्रमणाची संख्या सुमारे ९२ टक्क्यांनी घटेल. परंतु जर केवळ ३०-४० टक्के लोक मास्क घालत असतील तर त्याचा जास्त फायदेशीर परिणाम होणार नाही. केंब्रिज विद्यापीठाने आपल्या संशोधनात असे म्हटले की, जर कोणी घराबाहेर मास्क घातला तर साथीच्या रोगाची दुसरी लाट टाळता येऊ शकते.

- Advertisement -

पहिल्यापासून मास्क प्रभावी होता

गेल्या काही शतकातील अनुभवानुसार, मास्क संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहे. लॅन्सेटच्या म्हणण्यानुसार, बॅक्टेरियोलॉजिस्ट कार्ल फ्लगने १८९० च्या दशकात हे दाखवून दिले की, श्वसनाच्या थेंबांमध्ये बॅक्टेरिया असतात. १८९७ मध्ये, त्याचा सहकारी आणि सर्जन जोहान मिकुलिकझने ऑपरेशन दरम्यान मास्क वापरण्यास सुरुवात केली. १९३५ पर्यंत जवळ-जवळ सर्व शल्य चिकित्सकांनी चेहऱ्यावर मास्क घालायला सुरुवात केली. सीएनएनच्या दुसर्‍या अहवालानुसार, १९१०-१९११च्या मंचूरियन प्लेगच्या वेळी मास्क प्रभावी ठरला होता. सॅन फ्रान्सिस्कोने १९१८-२० साली स्पॅनिश फ्लू सर्व देशभर पसरलेला असताना साथीच्या वेळी सॅन फ्रान्सिस्कोने मास्क परिधान करणे अनिवार्य केले होते. मास्क परिधान न करणार्‍यांना ५-१०० डॉलर दंड आणि १० दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली.

मास्क जोखीम कमी करतो

आयोवा विद्यापीठाच्या संशोधनात असे दिसून आले की, मास्क परिधान केल्यावर खोकताना तोंडातून निघणारे पाण्याचे थेंब ९० टक्के कमी करते. मास्कचे अन्य बरेच फायदे आहेत. श्वसनावाटे निघणारे थेंब हे आपल्या डोळ्यांपर्यंत जाण्यास रोखतात. आपण आपल्या हातांनी आपला चेहरा स्पर्श करु शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -