घरताज्या घडामोडीपुण्यात आतापर्यंत १० हजार १५६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात आतापर्यंत १० हजार १५६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Subscribe

पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून पुणे विभागात आतापर्यंत १० हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून पुणे विभागात आतापर्यंत १० हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुणे विभागात सध्या १५ हजार ८९३ रुग्ण असून ५ हजार २१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

७१६ जणांचा मृत्यू

पुणे विभागात आतापर्यंत ७१६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर २५४ रुग्णांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ४.५१ टक्क्यांवर आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात अधिक प्रादुर्भाव

पुणे विभागात सर्वाधित प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात झाला असून पुणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ३८९ कोरोनाबाधित रुग्ण असून ७ हजार ९२२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण ३ हजार ९५२ असून ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २५४ रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ४.१६ टक्के इतके आहे.


हेही वाचा – जायखेडा : कोरोना रुग्णांत एकने वाढ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -