घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतच्या टीमने लॉन्च केली वेबसाइट; आता अभिनेते व्यक्त होणार!

सुशांत सिंह राजपूतच्या टीमने लॉन्च केली वेबसाइट; आता अभिनेते व्यक्त होणार!

Subscribe

सुशांतच्या टीमने सांगितले की, Self Musing हे सुशांतचे स्वप्न होते

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून रोजी आत्महत्या केली. प्रत्येक जण त्याच्या जाण्याने खूप दु: खी आहे. सुशांतच्या निधनानंतर, त्याच्या टीमने अभिनेत्याची मते आणि कल्पना शेअर करण्यासाठी selfmusing.com ही वेबसाइट सुरू केली आहे. सुशांतच्या टीमने सांगितले की, Self Musing हे सुशांतचे स्वप्न होते.

वेबसाइटची घोषणा करताना त्यांच्या टीमने सुशांत सिंह राजपूत यांच्या फेसबुक पेजवर लिहिले की- तो आमच्यापासून दूर गेला पण अजूनही आपल्यामध्ये तो जिवंत आहे. #SelfMusing सुरू करत आहे. आपल्यासारखे चाहते सुशांतचे खरे “गॉडफादर” होते. त्याला दिलेल्या वचनानुसार या जागेचे त्यांच्या सर्व विचार, शिकवण, स्वप्ने आणि इच्छांमध्ये रूपांतर करीत आहोत.

- Advertisement -

He is away but he is still alive with us. Kickstarting #SelfMusing mode https://selfmusing.com/Fans like you were…

Sushant Singh Rajput ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜೂನ್ 16, 2020

सध्या ही वेबसाइट्स डेव्हलपमेंटच्या शेवटच्या टप्प्यात असून त्याचे सध्या मुख्यपृष्ठ आहे. त्याच बरोबर वर्णनात असे लिहिले की, सुशांत सिंह राजपूत एक भारतीय अभिनेता, नर्तक, उद्योजक होता. # SelfMuse ही त्याची आवड होती. दरम्यान, रविवारी सुशांतने मुंबईत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूने प्रत्येकाला हादरवून सोडले. प्रत्येकजण त्यांच्यासाठी पोस्ट करत आपले दुःख व्यक्त करताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत होता नैराश्यात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -