घरताज्या घडामोडीमुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्यासाठी ७०० पंप

मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचा निचरा करण्यासाठी ७०० पंप

Subscribe

रेल्वे, एमएमआरडीएससह एमएमआरसी व महापालिकेच्यावतीने हे पंप बसवण्यात आले आहेत.

मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होवून जाते. रस्ते वाहतुकीसाठी रेल्वे  वाहतूकही विस्कळीत होवून जाते. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सहा पंपिंग स्टेशनची उभारणी केली असली तरी या व्यतिरिक्त मुंबईच्या रस्त्यांवर सुमारे  ७०० पंप बसवले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे, एमएमआरडीएससह एमएमआरसी व महापालिकेच्यावतीने हे पंप बसवण्यात आले आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचरा करण्यासाठी हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंदर, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंद आदी पपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. या सर्व पपिंग स्टेशनमधून सेकंदाला ६ हजार लिटर पाण्याचा विसर्ग होतो. मात्र, अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडतच असतात. यंदा पाणी तुंबण्याचा हॉटस्पॉट असलेल्या हिंदमाताच्या ठिकाणी पावसाळी पाणी वाहून नेणारी पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण फारच कमी असणार आहे.

- Advertisement -

परंतु मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये तसेच रेल्वे मार्गावर आणि मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण सातशे पंप बसवले जाणार आहेत. यामध्ये महापालिकेच्यावतीने ३३० पंप, पश्चिम रेल्वेच्यावतीने ५० पंप, मध्य रेल्वेच्यावतीने ७२ आणि एमएमआरडीए व मुंबई मेट्रोच्यावतीने २४५ पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे यासर्व पंपाद्वारे तुंबलेले पाणी मलवाहिनी किंवा अन्य मोकळ्या जागेत सोडून पाण्याचा निचरा करण्याचे काम केले जाते.

रस्त्यांवर व रेल्वे मार्गावर बसवण्यात आलेले पंप

महापालिका : ३३०

- Advertisement -

पश्चिम रेल्वे : ५०

मध्य रेल्वे : ७२

एमएमआरडीए- मेट्रो : २४५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -