घरताज्या घडामोडीगेल्या २४ तासांत पुण्यात ४७२ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ११ हजार पार

गेल्या २४ तासांत पुण्यात ४७२ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ११ हजार पार

Subscribe

गेल्या २४ तासांत सर्वाधिक वाढ झाली असून आज ४७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पुण्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक वाढ झाली असून आज ४७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १९३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पुण्यात आज ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

४७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारा; सध्या प्रकृती गंभीर असलेल्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात ४९ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ११ हजार ११५ वर पोहोचली आहे. तर ३ हजार ७२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ४७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आजपर्यंत एकूण ६ हजार ९०६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळे ८६२ करोना मृतांची नोंद


तर पिंपरी – चिंचवड शहरात सर्वाधिक १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर दापोडी येथील ६५ वर्षीय, दिघी येथील ४३ वर्षीय आणि शिरपूर धुळे येथील ६६ वर्षीय पुरुषांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

राज्यात ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मिशन बिगीन अगेनच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला आहे. यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी आज दिवसभरात राज्यात १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ च्या घरात पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -