घरताज्या घडामोडीभारतीय जवानांनी चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं होतं, केंद्रीय मंत्र्याचा दावा

भारतीय जवानांनी चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं होतं, केंद्रीय मंत्र्याचा दावा

Subscribe

१५ जून रोजी झालेल्या चकमकीत दोन्ही देशाच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे.

भारत- चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आलं. तर चीनचे ४o हून अधिक सैनिक मारले गेल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर भारतीय जवानांनी चीनच्या काही सैनिकांना बंदी बनवलं होतं असा दावा केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माजी लष्कर प्रमुख असणारे व्ही के सिंग यांनी हा दावा केला आहे. या आधी भारत – चीनच्या सीमारेषेवर झालेल्या हिंसक झटापटीनंतर चीनने भारतीय लष्करातील १० जवानांना ताब्यात घेऊ गुरूवारी संध्याकाळी सुटका केल्याची माहिती पीटीआयने दिली होती. यात दोन मेजर्सचाही समावेश होता.

१५ जून रोजी झालेल्या चकमकीत दोन्ही देशाच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे. चीनने आपले काही जवान परत केल्याचं वृत्त आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नियंत्रण रेषा पार करुन आपल्याकडे आलेल्या चिनी सैनिकांनाही आपण परत केलं आहे,” असं व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आपणही चीनने जवळपास ४३ जवान ठार केले आहेत. असा दावा व्ही के सिंग यांनी केला आहे.

- Advertisement -

चिनी सीमेवर झालेल्या या हिंसक घटनेमध्ये भारतीय लष्कराच्या एकूण ७६ सैनिकांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी १८ जणांना गंभीर तर ५८ जणांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. १८ जणांवर लेहमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून इतर ५८ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे.


हे ही वाचा – अखेर तीन दिवसांनंतर चीनने केली भारतीय जवानांची सुटका!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -