घरताज्या घडामोडीअखेर तीन दिवसांनंतर चीनने केली भारतीय जवानांची सुटका!

अखेर तीन दिवसांनंतर चीनने केली भारतीय जवानांची सुटका!

Subscribe

तीन दिवस यासंदर्भातील वाटाघाटी सुरु होती अशी माहिती या प्रकणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारत – चीनच्या सीमारेषेवर झालेल्या हिंसक झटापटीनंतर चीनने भारतीय लष्करातील १० जवानांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या १० जवानांची चीनने गुरूवारी संध्याकाळी सुटका केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. यात दोन मेजर्सचाही समावेश आहे.

तीन दिवस यासंदर्भातील वाटाघाटी सुरु होती अशी माहिती या प्रकणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे,”  यानंतर “दोन मेजर्ससहीत भारतीय लष्कराच्या दहा जवानांची चिनी लष्कराने गुरुवारी संध्याकाळी सुटका केली. असं पीटीआयने म्हटलं आहे.

- Advertisement -

मागील तीन दिवसांपासून चर्चा

मागील तीन दिवसांपासून भारत आणि चिनी लष्कराच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांची सतत चर्चा सुरु होती. भारत आणि चिनी लष्करातील मेजर जनरल स्तरावरील अधिकऱ्यांच्या चर्चेनंतर चीनने ताब्यात घेतलेल्या भारतीय जवानांची सुटका केली. यासंदर्भात भारतीय लष्कराने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीनंतर कोणताही भारतीय सैनिक बेपत्ता नसल्याची माहिती गुरुवारी भारतीय लष्कराने दिली होती.

चिनी सीमेवर झालेल्या या हिंसक घटनेमध्ये भारतीय लष्कराच्या एकूण ७६ सैनिकांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी १८ जणांना गंभीर तर ५८ जणांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. १८ जणांवर लेहमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून इतर ५८ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कर्मचाऱ्याने पगार मागितला म्हणून मालकाने कुत्र्याला त्याला चावायला सांगितले!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -