घरCORONA UPDATEआरटीई प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात

आरटीई प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात

Subscribe

कागदपत्रे पडताळणी आणि मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधील तांत्रिक कामे पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्षे २०२०-२१ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला सरकारने मान्यता दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबवण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कागदपत्रे पडताळणी आणि मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधील तांत्रिक कामे पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही कामे पूर्ण होताच पुढील आठवड्यामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार खाजगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रवेश प्रक्रियाच बंद करण्यात आली. जाहीर झालेल्या सोडतीत राज्यभरात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी आणि मुख्याध्यापकांच्या लॉगिनमधील काही तांत्रिक कामे शिल्लक राहिली आहेत. ही कामे पूर्ण होताच आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परंतु ही तांत्रिक कामे पूर्ण होण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

- Advertisement -

सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. आरटीई पोर्टलवर शाळेला लॉगीनला विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -