घरCORONA UPDATECorona Update: राज्यात मागील २४ तासांत ४ हजार १६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

Corona Update: राज्यात मागील २४ तासांत ४ हजार १६१ जणांना मिळाला डिस्चार्ज

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून चिंतेत आलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील ४ हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७३ हजार ७९२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ३ हजार ८९० नव्या रुग्णांची नोंद झाली असून गेल्या २४ तासांत २०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६२ हजार ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यात आज २०८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीत आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ८२, सोलापूर – १३, नाशिक- १०, नवी मुंबई – ०९, जळगाव – ०८, कल्याण डोंबिवली – ०५, ठाणे – ३, उल्हास नगर – ०१, भिवंडी – १, पिंपरी चिंचवड – १ अकोला – १, सातारा – १ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ७२ टक्के इतका आहे. तर, आज राज्यात ३८९० नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ९०० झाली आहे.

हेही वाचा –

घ्या, हेच बाकी होतं आता! इम्युनिटी वाढवणारं Ice Cream बाजारात दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -