घरताज्या घडामोडीघरभाड्यासाठी महिलेला पेटवले

घरभाड्यासाठी महिलेला पेटवले

Subscribe

घरमालकासह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

घरभाडे वसुलीसाठी घरमालक व भाडेकरूमध्ये बाचाबाची झाल्याने रागाच्या भरात घरमालकासह त्याच्या नातलगांनी भाडेकरू महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.३०) सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान भारतनगर येथे घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून संशयितांनी अंगावर रॉकेल ओतून जाळले, असे महिलेने मृत्यूपुर्वी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा असिम शेख (१८, रा.भारतनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. बबू, अश्रफ बाबुलाल शेख (३२, रा. शिवाजीवाडी,भारतनगर) राणी (पूर्ण नाव नाही), अमन (पूर्ण नाव नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पती असिम, मुलगा यांच्यासह आयेश शेख भारतनगर येथील भाड्याच्या घरात राहतात. काही महिन्यांपासून शेख यांचे घरभाडे थकले होते. घरभाड्यासाठी घरमालकाने तगादा लावला होता. मंगळवारी (दि.३०) सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान घरमालक व त्याच्या नातलगांनी शेख यांच्याशी घरभाडे वसुलीसाठी वाद घातला. त्यांनतर घरमालकासह चौघांनी आयेश शेख यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी पती असिम शेख यांनी पत्नीस जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी (दि.१) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटींदे यांनी आयेश शेख यांचा जबाब नोंद केला. संशयितांनी अंगावर रॉकेल ओतून जाळले, असे महिलेने मृत्यूपुर्वी कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन मार्तंड श्रीवंत करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -