घरCORONA UPDATEतुम्ही डॉक्टर किंवा नर्स आहात? तर 'ही' आहे तुमच्यासाठी खास खुशखबर!

तुम्ही डॉक्टर किंवा नर्स आहात? तर ‘ही’ आहे तुमच्यासाठी खास खुशखबर!

Subscribe

या योजनेला 'टफ कुकी' अभियान असे नाव दिले आहे.

कोरोनाच्या या कठीण प्रसंगात डॉक्टर आणि नर्स मोठ्या हिंमतीने काम करत आहेत. अहोरात्र रूग्णांना सेव देत आहेत. त्यांच्या कार्याला देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने सलाम करीत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने गुरुवारी जाहीर केले की, २०२० च्या अखेरीस ते डॉक्टर आणि परिचारिकांना हवाई तिकीटात २ टक्के सवलत देणार आहेत. एअरलाइन्सने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, “परिचारिका व डॉक्टरांनी आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून तपासणीच्या वेळी रुग्णालयाचा वैध आयडी दाखवणे गरजेचे आहे. इंडिगोने या योजनेला ‘टफ कुकी’ अभियान असे नाव दिले आहे.

इंडिगोने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, इंडिगो वेबसाइटवरून तिकीट काढताना सवलत दिली जाईल. ही सूट १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या प्रवासासाठी दिली जाईल.

- Advertisement -

मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी ट्विटरवर सांगितले की १ जुलै रोजी ७१,४७१ प्रवाश्यांनी ७८५ विमानात प्रवास केला. याचाच अर्थ बुधवारी सरासरी ९१ प्रवाश्यांनी विमानात प्रवास केला. सामान्यत: वापरल्या जाणार्‍या ए ३२० विमानात जवळपास १८० जागा असल्याने १ जुलै रोजी प्रवाशांची संख्या जवळपास ५० टक्के होती.


हे ही वाचा – सीमावाद : अमेरिकेने घेतली भारताची बाजू, चीनला कठोर शब्दात सुनावले!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -