घरCORONA UPDATEरशियांमध्ये अडकलेल्या ४८० वैद्यकीय विद्यार्थी परतीच्या मार्गावर

रशियांमध्ये अडकलेल्या ४८० वैद्यकीय विद्यार्थी परतीच्या मार्गावर

Subscribe

लॉकडाऊनमुळे रशियामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ४८० वैद्यकीय विद्यार्थी अडकले होते. राज्य सरकारने पुढाकार घेत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. हे विद्यार्थी रविवारी मॉस्को विमानतळावरून भारतात येण्यासाठी निघाले असून, सोमवारी पहाटे ५ वाजता ते मुंबई विमानतळावर उतरणार आहेत.

कोरोनामुळे विविध देशांमध्ये केलेल्या लॉकडाऊनमुळे रशियामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ४८० वैद्यकीय विद्यार्थी अडकले होते. राज्य सरकारने पुढाकार घेत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. हे विद्यार्थी रविवारी मॉस्को विमानतळावरून भारतात येण्यासाठी निघाले असून, सोमवारी पहाटे ५ वाजता ते मुंबई विमानतळावर उतरणार आहेत.

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे हवाई वाहतूक सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले ४८० विद्यार्थी तेथेच अडकले. यातील ५७ विद्यार्थ्यांनी नुकतीच पदवी घेतली असून, ते रुग्णसेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत रशिया आणि भारतीय दुतावासांशी संपर्क साधत या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याला यश आले असून, या विद्यार्थ्यांना रॉयल फ्लाईट बोईंग ७७७ या चार्टड विमानाने भारतात आणण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना भारतात आण्यासाठी निक्स टूरचे संचालक डॉ. निकेश रंजन यांनी रशियाचे रॉयल फ्लाईट आणि मॉस्कोमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून चार्टड विमानाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि नागरी हवाई विभागाचे मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे शिक्षण सदस्य व युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी समन्वयाची भूमिका पार पडत विविध परवानगी मिळवण्याचे काम चोख पार पाडले. रशियातून भारतामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यात आले आहे. हे विमान महाराष्ट्रात आणण्यात आल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनाही रशियामधून परत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

- Advertisement -

रशियामध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यात येत असल्याबद्दल त्यांच्या पालकांकडून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सीएमओ कार्यालय, मॉस्कोमधील भारतीय दुतावास, डीजीसीए आणि रॉयल फ्लाईट रशियाचे पालकांकडून आभार मानण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -