घरदेश-विदेशतुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर!

तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर!

Subscribe

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक, हागिया सोफिया दीडशे वर्षांपूर्वी ग्रीक साम्राज्यात कॅथेड्रल चर्च म्हणून बांधण्यात आले होते

इस्तांबूलमधील जगप्रसिद्ध इमारत आणि म्यूझियम हागिया सोफियाला मशिदीत रूपांतरित करण्याचा निर्णय तुर्की सरकारने घेतला आहे. तेथील कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर तुर्कीचे राष्ट्रपती तैयब एर्दोगन यांनी हा बदल जाहीर केला आहे. तुर्कीमधील काही इस्लामिक आणि राष्ट्रवादी गट बरेच दिवसांपासून त्या म्युझियमला मशिदीत रूपांतरित करण्याची मागणी करत होते. आता कोर्टाने आणि सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली असून २४ जुलैपासून हागिया सोफियामध्ये साधारण ८४ वर्षानंतर पुन्हा एकदा नमाज पठण केले जाणार आहे.

- Advertisement -

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक, हागिया सोफिया दीडशे वर्षांपूर्वी ग्रीक साम्राज्यात कॅथेड्रल चर्च म्हणून बांधण्यात आले होते. १४५३ मध्ये युरोपमधील आटोमन युद्धा नंतर त्याचे मशिदीत रूपांतर झाले. पण १९३४ मध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्याचे एका म्यूझियममध्ये रूपांतर केले गेले.

अलजजीरा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, तुर्की सरकारचे म्हणणे आहे की, आमच्या मशिदींप्रमाणेच, हगिया सोफियाचे दरवाजेही सर्वांसाठी खुले असतील. स्थानिक, विदेशी मुस्लिम आणि बिगर मुस्लिमही येथे येऊ शकतील असे राष्ट्रपती तैयब एर्दोगन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, तैयब एर्दोगन यांच्या निर्णयावर कडक टीका केली जात आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाला ख्रिश्चन आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संग्रहालय म्हणून राहू द्यायला हवे होते. या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त करताना युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अजोले म्हणाले की, ही इमारत वास्तुकलेची उत्कृष्ट नमुना आहे आणि शतकानुशतके युरोप आणि आशियामधील संवादाचा हा अनोखा पुरावा आहे. युनेस्कोने असेही म्हटले की, सोफिया संग्रहालयात काही बदल होण्यापूर्वी तुर्कीला याची माहिती द्यायला हवी होती.

याशिवाय या प्रकरणात संयुक्त राष्ट्र संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय चर्च परिषदेने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून निराशा व्यक्त केली आणि त्यांना आपला निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली. यासह अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मार्गन अर्टगस म्हणाले की, हागिया सोफियाची स्थिती बदलण्याच्या तुर्की सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. ग्रीस आणि रशियाच्या ख्रिश्चन समुदायानेही याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.


कोरोना फुफ्फुसावरच नाही तर हृदय, मेंदूसह इतर अवयवांवरही करतो हल्ला!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -