घरदेश-विदेशसचिन पायलट भाजपच्या संपर्कात

सचिन पायलट भाजपच्या संपर्कात

Subscribe

दोन वरिष्ठ नेत्यांची माहिती

राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस पक्षाने मंगळवारी म्हणजेच आज पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदारांना केलं आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. मात्र, राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात असलेल्या बंडखोर भूमिकेवर ठाम असल्याचे पायलटच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, पायलट यांची समजूत काढण्यात काँग्रेसचे बडे नेते त्यांच्या संपर्कात आहेत.

सचिन पायलट गटाचे आमदार वेदप्रकाश सोलंकी यांनी मानेसरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या सोबत आहेत. त्यांनी दि इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की सचिन पायलटमुळे आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी तयार आहोत. पायलट भाजपमध्ये सामील झाल्यावर तुम्ही त्यांना साथ देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, असं काहीही अद्याप नाही. जिथे त्यांना आमची गरज असेल तेथे आम्ही जाऊ. सचिनजी यांना राज्याचे मुख्यमंत्री करावं अशी आमची मागणी आहे. आम्ही त्यांच्यामुळे जिंकलो. त्यांच्यामुळे तरुणांनी आम्हाला मतदान केलं.

- Advertisement -

पायलट अद्याप मीडियापासून दूर राहिले असून सोमवारी त्यांनी कोणतंही विधान जाहीर केलं नाही. रविवारी त्यांनी भाजपमध्ये सामील होत नसल्याचं सांगितलं. परंतु दोन वरिष्ठ नेत्यांनी (एक राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि दुसरे पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय) यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की पायलट भाजपच्या संपर्कात आहेत याची त्यांना कल्पना आहे.


हेही वाचा – काँग्रेसच्या बैठकीला पायलट जाणार नाहीत; त्यांच्या गटाने प्रसिद्ध केला व्हिडीओ

- Advertisement -

सूत्रांचं म्हणणं आहे की कॉंग्रेसचं नेतृत्व हे संकट निवारण्यात व्यस्त आहे. यात मंत्रिमंडळात फेरबदल करणे आणि सचिन पायलट आणि त्याचे निष्ठावंत आमदारांना अधिक वजनदार मंत्रीपद देणं आणि वादग्रस्त एफआयआर आणि पोलीस नोटीस मागे घेण्याचाही समावेश आहे. सचिन पायलट यांच्याकडे सध्या चार मंत्रालयांची जबाबदारी आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास; पंचायती राज आणि विज्ञान तंत्रज्ञान व सांख्यिकी विभाग यांचा समावेश आहे.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं की, गेहलोत गटाकडे १०९ आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षर्‍या आहेत. यामध्ये कॉंग्रेस, अपक्ष आणि काही छोट्या पक्षांचा समावेश आहे. एक नेते म्हणाले की, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला १०४ आमदार देखील उपस्थित होते. तर गेहलोत सरकार पाडण्यास अपात्र असलेल्या सचिन पायलट यांच्याकडे १७ ते १८ कॉंग्रेसचे आमदार आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजस्थानमधील आपले सरकार वाचवण्यासाठी १०१ आमदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. राज्यात २०० विधानसभा जागा आहेत, पण पायलट गटाचं म्हणणं आहे की जवळपास तीस आमदार त्यांच्या पाठीशी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -