घरताज्या घडामोडीRajasthan Live Update : हे तर भाजपचे माझ्याविरोधातील षडयंत्र - अशोक गेहलोत

Rajasthan Live Update : हे तर भाजपचे माझ्याविरोधातील षडयंत्र – अशोक गेहलोत

Subscribe

सचिन पायलट यांनी पक्षातून बाहेर पडणे म्हणजे आणखी एका तरुण नेत्यात पक्षात येण्याची संधी मिळणे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. या संबंघीचे वृत्त एएनआयने ट्विटरवरून दिले आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे. (सविस्तर वृत्त)

- Advertisement -

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यासोबतच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आज तक या हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, भाजपने माझ्या विरोधात षडयंत्र रचले असून त्यात ते अयशस्वी ठरले आहेत.


सचिन पायलट यांनी मीडियासमोर आपली खदखद मांडल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सचिन पायलट यांच्याविरोधात गौप्यस्फोट केला आहे. सचिन पायलट स्वतःच राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नाता होते, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

सचिन पायलटच्या नाराजीवर सुरजेवाला म्हणाले की, गेल्या १४ – १५ वर्षात अनेकदा मोठ्या पदांवर पायलट यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेस किंवा भाजपमध्ये कोणालाही इतके प्रोत्साहन मिळाले नाही जितके पायलट त्यांना मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे आणि चर्चा करावी. तसेच सचिन पायलट यांना पक्षात ओढण्याचे भाजपचे षडयंत्र फेल ठरले असल्याचा टोलाही यावेळी सुरजेवाला यांनी लगावला. (सविस्तर वाचा)


भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरु आहे. लोकशाही संपवणारे दिल्लीत बसलेत, असा आरोप अशोक गेहलोत यांनी भाजपवर केला आहे.


सचिन पायलट यांना बंडखोरीनंतर त्याच्याकडून उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलं. मात्र, सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत, असं अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे.


सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे.


आपल्या पुढील वाटचालीवर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल, असं म्हटलं आहे. मी अजूनही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असं देखील सचिन पायलट म्हणाले.


राजस्थानमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करत उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. यानंतर सचिन पायलट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे. पायलट भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, मी भाजपमध्ये जाणार नाही असं पायलट यांनी जाहीर केलं आहे. सविस्तर वाचा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -