घरदेश-विदेशज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी खुशाल जावं - राहुल गांधी

ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी खुशाल जावं – राहुल गांधी

Subscribe

राजस्थानमधील राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचक वक्तव्य करत सचिन पायलटला टोला लगावल आहे. राहुल गांधी यांनी एनएसयुआयच्या बैठकीत एखाद्या नेत्याचे पक्ष सोडून जाणे म्हणजे दुसऱ्या एका तरुण नेत्यासाठी पक्षात प्रवेशाचा मार्ग मोकळा होणे, असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नाराजीचे वृत्त माध्यमातून येत आहे. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरूनही हटवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडून सचिन पायलट भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. त्यावर सचिन पायलट यांनी पक्षातून बाहेर पडणे म्हणजे आणखी एका तरुण नेत्यात पक्षात येण्याची संधी मिळणे, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. या संबंघीचे वृत्त एएनआयने ट्विटरवरून दिले आहे. 

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे. त्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

दरम्यान, राजस्थानच्या राजकारणाने आता सामंजस्यातून आरोप – प्रत्यारोपांपर्यंतची मजल मारली आहे. एकमेकांना समजून घेण्याची भाषा करणारे काँग्रेसचे नेते आता उघडपणे तक्रारी मांडू लागले आहेत. सचिन पायलट यांनी मीडियासमोर आपली खदखद मांडल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सचिन पायलट यांच्याविरोधात गौप्यस्फोट केला आहे. सचिन पायलट स्वतःच राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नाता होते, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. आमच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असून माझ्याकडे याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

हे आहे विरार ते डहाणु दरम्यानच्या २ मेमूचे वेळापत्रक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -