घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCorona: अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६७,३३२ रुग्णांची भर, एकूण आकडा ३६ लाख...

Corona: अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६७,३३२ रुग्णांची भर, एकूण आकडा ३६ लाख पार!

Subscribe

जीवघेण्या कोरोना महामारीमुळे महासत्ता अमेरिकेला सर्वात जास्त फटका बसला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत १ लाख ४० हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अमेरिकेत झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत दररोज ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. एफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६७ हजार ६३२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत ३६ लाख १६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ लाख ४० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर स्या १८ लाख ३० हजारांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण न्यूयॉर्क शहरात आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ३० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कनंतर कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्सास या शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या शहरामध्ये २ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून लवकरच अमेरिकेत कोरोना लसीबाबत चांगली बातमी येऊ शकते असे सांगितले आहे. अमेरिकेतील लसीमुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढ असल्याचा दावा अमेरिकन वैज्ञानिकांनी केला आहे. या लसीची चाचणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही लस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ हेल्थ अॅण्ड मॉर्डन इंकच्या संशोधकांनी तयार केली आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे हे शोधण्यासाठी २७ जुलैच्या आसपास ३० हजार लोकांवर संशोधन केले जाण्याची अंदाज आहे. याआधी मंगळवारी संशोधकांनी ४५ लोकांवर घेण्यात आलेल्या प्राथमिक चाचणीच्या निष्कर्षात लस रोग प्रतिकारशक्ती वाढवते हे उघड झाले होते.


हेही वाचा – कोरोनामुळे देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -