घरCORONA UPDATEकोरोनामुळे देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनामुळे देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना कोरोनाशी लढणाऱ्या कोविड योद्ध्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. पोलीस, जवान, सफाई कर्मचारी यांच्यासह रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशभरात १,३०२ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी ही धोक्याची घंटा असून, वैयक्तिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलं आहे.

कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर महत्त्वाचा भाग आहेत. परंतु अनेक ठिकाणी वैद्यकीय आस्थापनांमध्ये संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्याने वरिष्ठ डॉक्टरांसह तरुण डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, देशभरात ८ टक्के डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाबाधित डॉक्टरांमध्ये ५८६ डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर आणि १५० सर्जन यांचा समावेश आहे. मृतांमध्ये ५० वर्षांवरील ७३, ३५ ते ५० वयोगटातील १९, ३५ वर्षांखालील ७ डॉक्टरांचा समावेश आहे.

- Advertisement -

काय आहेत सूचना?

  • डॉक्टरांना संसर्गाची बाधा होणार नाही यासाठी आयएमएने काही शिफारशी केल्या आहेत. वैद्यकीय आस्थापनांनी सुरक्षेसाठीच्या उपाययोजनाचा आढावा घेणे गरजेचे आहे. यासह संसर्ग नियंत्रणासाठीही पावले उचलावीत.
  • डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिप्राय मागवावेत. वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर, रुग्णांचे वर्गीकरण यावर दररोज देखरेख करावी.
  • शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूतीकक्ष, प्रयोगशाळा, अपघात विभाग या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात यावी. अतिदक्षता विभागात संसर्ग पसरू नये यासाठी नियमावलीनुसार उपाययोजनांची योग्यरितीने अंमलबजावणी केली जावी.

हेही वाचा – ओबामा, नेतान्याहू, बिल गेट्स, Appleसह अनेक अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -