घरट्रेंडिंगVideo : सुशांत आजही 'जिवंत' आहे; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

Video : सुशांत आजही ‘जिवंत’ आहे; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेला एक महिना उलटला असून त्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहे. त्याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केली होती. मात्र अद्याप त्यावर निर्णय आलेला नाही. दरम्यान, सुशांतच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबिय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांत या जगात नाही, हे अजूनही पटत नसल्याचे त्याचे मित्रपरिवार सांगतात. अशामध्ये आपण सुशांतशी बोललो असून तो आजही जिवंत आहे, असा दावा जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टने केला आहे.

जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट स्टीव्ह हफ्फ यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘थांबा, सुशांत आजही ‘जिवंत’ आहे. मी त्याच्या आत्म्याशी बोललो आहे. स्वर्गात त्याच्यासोबत एक महिलादेखील आहे.’ पॅरानॉर्मल एक्स्पर्ट स्टीव्ह हफ्फ यांवी यासंबंधीचा एक व्हिडिओदेखील बनवला आहे. या व्हिडिओमध्ये स्टीव्ह यांनी सुशांतच्या चाहत्यांनीच मोठ्या प्रमाणावर आपल्याला गळ घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्म्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मेसेज, ईमेलद्वारे या चाहत्यांनी केल्याचे स्टीव्ह यांनी म्हटले आहे. स्टीव्ह हफ्फ यांनी १३ जुलै रोजी सुशांतच्या आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना सुशांतशी बोलताना एका महिलेचाही आवाज आला. यावर त्यांनी सुशांत एकटा नाही, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रयोगाचा त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

काय झाले सुशांतसोबत बोलणे

स्टीव्ह यांनी सुशांतला तुझा मृत्यू कसा झाला असा प्रश्न विचारला. यावर, इथे मला प्रकाश मिळाला आहे हफ, त्यांना सांग मला प्रकाश मिळाला आहे. आता हा प्रकाश कमी होत चालला आहे. ते तुला पाहत आहे. मी खरेच देवाला भेटू इच्छित होतो. तुम्हाला माहिती आहे का, मी त्यांना काय सांगू इच्छित आहे. माझा आत्मा ठीक आहे आणि तो स्वर्गात आहे. यामध्ये एक पुरुष आणि महिला असल्याचे स्टीव्ह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

Rajasthan politics : अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना दिली आमदारांची यादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -