घरमुंबईमुंबई रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी '१०० कोटीं'ची गरज

मुंबई रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी ‘१०० कोटीं’ची गरज

Subscribe

आधीच्या ‘एमयूटीपी ३’ या ११ हजार कोटी रुपये प्रकल्पांच्या कामातील 'ऐरोली ते कळवा लिंक रोड' प्रकल्पामधील दिवा स्थानक सोडता अन्य कोणत्याही कामांना गती मिळालेली नाही. सर्व प्रकल्प हे निविदा प्रक्रियेत अद्याप अडकलेले आहेत

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाड्या, पनवेल ते विरार उपनगरीय मार्ग हे काही रेल्वेचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. एमयुटीपी-३ ए (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) या अंतर्गत हे काम सुरु आहे. ५४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी रेल्वेला १०० कोटी रुपयांची गरज आहे. म्हणूनच मुंबई रेल विकास महामंडळाने रेल्वे मंत्रालयाकडे १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

कसा आहे ‘एमयुटीपी – ए’ प्रकल्प?

शहरांचा विकास करणारा असा हा प्रकल्प असून ५४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. या प्रकल्पात ‘सीएसएमटी ते पनवेल’ उन्नत जलद मार्ग, २१० वातानुकूलित लोकल गाडया, ‘पनवेल ते विरार’ उपनगरीय मार्ग, ‘गोरेगाव ते बोरिवली’पर्यंत हार्बरचा विस्तार,  नवीन सिग्नल यंत्रणा (सीबीटीसी), ‘बोरिवली ते विरार’ पाचवा-सहावा मार्ग, ‘कल्याण ते आसनगाव’ चौथा मार्ग, ‘कल्याण ते बदलापूर’ तिसरा आणि चौथा मार्ग यासोबतच आणखी काही प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या हा प्रकल्प निती आयोगाकडे आहे.

- Advertisement -

१०० कोटींची गरज का?

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळेपर्यंत ‘एमयूटीपी-३ ए’ ला विलंब होऊ शकतो. त्यात्पूर्वी प्रकल्पांचे सर्वेक्षण आणि अन्य काही प्राथमिक कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी १०० कोटी निधीची गरज असल्याचे मागणी पत्रात रेल्वे विकास महामंडळाने नमूद केले आहे.

निविदा प्रकियेत अडकलेले प्रकल्प

आधीच्या ‘एमयूटीपी ३’ या ११ हजार कोटी रुपये प्रकल्पांच्या कामातील ‘ऐरोली ते कळवा लिंक रोड’ प्रकल्पामधील दिवा स्थानक सोडता अन्य कोणत्याही कामांना गती मिळालेली नाही. सर्व प्रकल्प हे निविदा प्रक्रियेत अद्याप अडकलेले आहेत. यामध्ये ‘विरार-डहाणू चौपदरीकरण’, ‘पनवेल ते कर्जत’ नवीन मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ‘एमयूटीपी-२’ मधील ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, ‘मुंबई सेंट्रल ते बोरिवली’ सहावा मार्ग, ‘सीएसएमटी ते कुर्ला’ पाचवा-सहावा मार्ग हे प्रकल्पही अडकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -