घरट्रेंडिंगVideo: मिग फायटर vs लॅम्बॉर्गिनीची सुसाट रेस

Video: मिग फायटर vs लॅम्बॉर्गिनीची सुसाट रेस

Subscribe

तरुणांचे लक्ष भारतीय नौदलाकडे वेधून घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कॅम्पेनचा एक भाग म्हणून ही अनोखी रेस आयोजित केल्याचं समजत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक अनोखी रेस पाहायला मिळते आहे. ही रेस आहे मिग २९ के या फायटर विमनाची – लॅम्बॉर्गिनी हरिकेन या कारसोबत. वाऱ्यासारखा तुफान वेग असणारी ही दोन वहानं जेव्हा एकमेकांशी रेस लावतात तेव्हा कोण बाजी मारतं? हे पहाणं खरच औत्सुक्याचं ठरतं. मिग फायटर आणि लॅम्बॉर्गिनी गाडी यांच्यातील ही भन्नाट रेस गोव्यामध्ये झाली. भारतीय नौदलाचा एअरबस असलेल्या गोव्यामधील डाबोलीम विमानतळावर ही भन्नाट रेस झाली. मिग विमानाने धावपट्टीवरुन हवेत उड्डाण घेण्यापूर्वी लॅम्बॉर्गिनीसोबत ही रेस लावली होती. उपलब्ध माहितीनुसार नौदलातील उच्च अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतरच हा व्हिडिओ शूट करुन मग तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. तरुणांचे लक्ष भारतीय नौदलाकडे वेधून घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कॅम्पेनचा एक भाग म्हणून ही अनोखी रेस आयोजित केल्याचं समजत आहे. दरम्यान मिग विमान आणि लॅम्बॉर्गिनी कारच्या या रेसचा व्हिडिओ भारताचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी ट्वीटरवरुन शेअर केला आहे.

पाहा या सुसाट रेसचा व्हिडिओ

- Advertisement -

वेगाची तुलना

मिग २९ हे विमान त्याच्या सुपरफास्ट वेगासाठी ओळखले जाते. भारतीय हवाई दलातील हे विमान हवेमध्ये सुमारे १ हजार ५०० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने अंतर कापू शकते. तर दुसरीकडे जगभरात आपल्या पॉवरफुल फिचर्स आणि स्पीडसाठी ओळखली जाणारी लॅम्बॉर्गिनी गाडी, ३१० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने जमिनीवरील अंतर कापते. आतापर्यंत झालेल्या नोंदीनुसार ३१० किमी/तास हा लॅम्बॉर्गिनी गाडीचा सर्वोत्तम वेग आहे. अशी दोन पॉवरफुल आणि वेगवान वहानं जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा त्यांच्यामधील रेस, पाहणाऱ्यालाही थक्क करुन टाकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -