घरCORONA UPDATEमहाराष्ट्राचा फंड दिल्लीला दिला त्यामुळे फडणवीस तिथे भेटतात - मुख्यमंत्री

महाराष्ट्राचा फंड दिल्लीला दिला त्यामुळे फडणवीस तिथे भेटतात – मुख्यमंत्री

Subscribe

संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील माहिती वरिष्ठ नेत्यांना देणाऱ्या फडणवीस यांच्याकडून आपण सल्ला आणि सूचना मागवल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोलाही उद्धव यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.

फडणवीसांचा दिल्ली दौरा

“राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत होते,” अशी राऊत यांनी हा प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “तिथे दिल्लीत जाऊन फडणवीसांनी महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोललेले आहेत. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन म्हाराष्ट्राची परिस्थिती सांगण्यामागील कारणाबद्दल बोलताना, “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोला उद्धव यांनी लगावाला.

- Advertisement -

राऊत यांनी “राज्यातील भयावह परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी प्रधानमंत्र्यांनाही भेटून देणं हे कितपत योग्य आहे?,” असा प्रश्न उद्धव यांना विचारला. “मी कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे. हे ठीक आहेत हे बोलतील पण कुठेही न जाता कुठेही न फिरता ज्या एका संस्थेने, खरं तर ती संस्था कोणती आहे ते मी पाहिलं नाही. मात्र त्या संस्थेने देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही सुद्धा त्यांची पोटदुखी असू शकेल, कारण करोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांच्यावर टीका केली.


हे ही वाचा – Video :लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा आता विचार नाही – मुख्यमंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -