घरटेक-वेकदमदार बॅटरीवाला रियलमीचा नवा स्मार्टफोन लाँच

दमदार बॅटरीवाला रियलमीचा नवा स्मार्टफोन लाँच

Subscribe

रियलमीचा Realme C15 दमदार बॅटरीवाला स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या सी मालिकेचा हा नवीन स्मार्टफोन आहे. Realme C15 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे. हा फोन भारतात लाँच केला जाईल की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही.

Realme C15 च्या 3GB + 64GB व्हेरिएंटची किंमत आयडीआर १,९९९,००० (सुमारे १०,३०० रुपये), 4GB + 64GB व्हेरिएंटची आयडीआर २,१९९,००० (सुमारे ११,३०० रुपये) आणि 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत आयडीआर २,४९९,००० (सुमारे १२,८०० रुपये) ठेवण्यात आली आहे. फोन मरीन ब्लू आणि सिगल सिल्व्हर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

- Advertisement -

Realme C15 ची वैशिष्ट्य

ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. 420 nits ब्राइटनेससह ६.५ इंच मिनी-ड्रॉप (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि GE8320 GPU सह ऑक्टा-कोर MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. फोनच्या मागील बाजूस 13MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा, 2MP ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर आणि 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा दिला आहे. याची बॅटरी 6,000mAh असून 18W वेगवान चार्जिंगचा सपोर्ट आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -