घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेवर शूटींगसाठी पुणे ठरले दबंग!

मध्य रेल्वेवर शूटींगसाठी पुणे ठरले दबंग!

Subscribe

२०१९- २० याआर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला  मिळाले आहे.

मध्य रेल्वेचे रेल्वे स्थानक नेहमीच चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय आहे. २०१९- २० याआर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला  मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे चित्रीकरणच्या माध्यमातून ४४.५२ लाख रुपयांच्या महसूल मिळाला असलातरी सर्वाधिक उत्पन्न हे एकट्या पुणे विभागातून मिळाले आहे. अवघ्या ३ चित्रपटांमधून ३७.२२ लाख रुपये उत्पन्न प्राप्त करत  मध्य रेल्वेवरील शूटींगसाठी पुणे  विभाग  पुन्हा एकदा दबंग ठरले आहे.

रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर तिन्ही ऋतूंमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. गेल्या एक वर्षात वेगवेगळ्या स्थानकांवर लघुपट, मालिका, चित्रपट, वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या जाहिरातींचे चित्रीकरण होत आहे.तसेच चित्रपट निर्मात्यांची आवश्यकता पूर्ण करणार्‍या अनेक सुंदर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मध्य रेल्वे मार्गवरील अनेक स्थळ/ स्थानके आहे. ज्यामध्ये चित्रीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकापासून आपटा,पनवेल, चौक, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडी बंदर सारख्या लोकप्रिय रेल्वे स्थानकांपर्यंत ही चित्रपटाच्या चित्रीकरणाची स्थळे आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते, अलीकडेच चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी वेगवान करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम सुरू केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातून मध्ये रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

- Advertisement -

कोट्यवधी रुपयांची कमाई

मध्य रेल्वे  २०१९-२० मध्ये २१ चित्रपटाच्या चित्रीकरणातून  १.३३ कोटी रुपये  उत्पन्न मिळविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह ८ चित्रपटांच्या चित्रीकरणातून ४४.५२ लाख, आपटा स्थानकात ४ फिल्म चित्रीकरणातून २२.६१ लाख रूपये उत्पन्न  मिळविले.पनवेल स्थानकात चित्रीकरण करण्यात आलेल्या रजनीकांत स्टारर फिल्म ‘दरबार’ कडून सर्वाधिक २२.१० लाख उत्पन्न  मिळविले. पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान स्टारर ‘दबंग 3’ याच्या परवानगी व  शुल्कासाठी १५.६२  लाख  यासह ३ चित्रपटांमधून  ३७.२२ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले.  पुणे ते मुंबई दरम्यान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण, तुर्भे आणि वाडी बंदर यार्ड, पुणे स्टेशन यासारख्या चित्रपटाच्या शूटिंग ठिकाणांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले.

- Advertisement -

आपटा स्थानकाला  सर्वाधिक पसंती

आपटा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो ज्याच्या एका बाजूला टेकडी आहे, दुस-या बाजूला नदीजवळील रस्ता आणि पोहोचण्यास  सुलभ रस्ता आहे, वळणदार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मसह पनवेल -रोहा मार्गावर हे स्थानक आहे.   कलाकारांची  व्हॅनिटी व्हॅन्स  पार्क करुन ठेवण्यासाठी पुरेशी जागा येथे आहे.  कमी गर्दी असलेले असे स्थानक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य स्थान आहे.”  आपटा रेल्वे स्थानकावर  काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे आणि ते क्रॉसिंग स्टेशन असल्याकारणाने आणखी एक ज्यादा  ट्रॅक असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुक केलेल्या विशेष गाड्यांच्या हालचालींसाठी जास्त सोयीची  आहे.  आपटा हे स्थानक फिल्म सिटी, मुंबईपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असून प्रवास फक्त २ तासांचा आहे.  त्यामुळे  वेब मालिका, माहितीपट आणि टीव्ही मालिकांच्या  चित्रीकरणासाठी आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -