घरदेश-विदेशराष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या Eid-Ul-Adha च्या शुभेच्छा!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या Eid-Ul-Adha च्या शुभेच्छा!

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज व्यक्तींनी ईद-उल-अजहाच्या दिल्या शुभेच्छा

आज देश आणि जगभरात ईद-उल-अजहाच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी आज उर्दू भाषेत आपल्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज व्यक्तींनी ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात या उत्सवाचे महत्त्व सांगताना राष्ट्रपतींनी कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईद-उल-अजच्या शुभेच्छा दिल्या आणि आशा व्यक्त केली की हा उत्सव आपल्याला न्याय्य, एकोपा आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी प्रेरणा देईल.  राष्ट्रपतींनी प्रथम उर्दू आणि नंतर हिंदीमध्ये ट्विट केले, “ईद मुबारक. ईद-उल-अजहा हा सण परस्पर बंधुता आणि त्यागाच्या भावनेचे प्रतीक आहे आणि लोकांना सर्वांच्या हितासाठी काम करण्यास प्रेरित करत आहे. ”

- Advertisement -

त्यांनी पुढे असेही लिहिले, “चला, या आनंदी प्रसंगी आपण गरजू लोकांसोबत आपला आनंद साजरा करूया आणि कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठीच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळूया.”

- Advertisement -

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ईद मुबारक. ईद-उल-अजहाच्या शुभेच्छा. हा दिवस आपल्याला एक न्याय, एकोपा आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देईल. ”ते म्हणाले की, बंधुता आणि करुणा या भावनेने पुढे जायला हवे. ईद-उल-अजहा कुर्बानीचा सण म्हणूनही ओळखला जातो. हा देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

ईद-उल-अजहा चा सण ईदच्या प्रार्थनेने सुरू होतो, सर्व मुस्लिम पुरुष मशिदीत ईदची नमाज अदा करतात. ईदच्या नमाजानंतर कुर्बानी दिली जाते. मात्र यंदा कोरोनाव्हायरसमुळे मुस्लिम बांधवांना ईदचा नमाज त्यांच्या घरी अदा करावा लागणार आहेत.


Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा! फोटो व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -