घरताज्या घडामोडीलिंगभेद पुसण्यास सुरुवात; दादरच्या सिग्नलवर पुरुषाऐवजी आता महिलेचे चिन्ह

लिंगभेद पुसण्यास सुरुवात; दादरच्या सिग्नलवर पुरुषाऐवजी आता महिलेचे चिन्ह

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने आपल्या एका कृतीतून लिंगभेद समानतेवर उत्कृष्ट भाष्य केले आहे. दादरमधील एका सिग्नलवर महिला प्रतिमेचे चिन्ह वापरुन लिंग समानतेचा संदेश दिला आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या सिग्नलचा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात की, “तुम्ही जर दादरहून जात असाल तर सिग्नलवरील एका चित्राने तुमचा उर भरून येईल. जीएन प्रभागाने लिंग समानतेचा संदेश देण्यासाठी एक सोपी क्लृप्ती लढवली आहे. आता सिग्लनलच्या थांबा चिन्हावर महिलेची देखील प्रतिमा आपल्याला दिूसन येत आहे.”

- Advertisement -

हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांचे आभार मानले आहेत. तर हा उपक्रम राबिवण्याठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांचे देखील आभार मानले आहेत.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका लवकरच रोड सिग्नल आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या मार्गिकेवरील १३ ठिकाणचे चिन्ह बदलणार आहे. दादर ते माहिम दरम्यान असलेल्या ४.५ किमी रस्त्यावरील हे सिग्नल बदलले जाणार आहेत. सिग्नल बदलण्यात येणारा कॅडेल रस्ता (Cadell Road) सिद्धिविनायक मंदिर, माहिम दर्गाह, माहिम चर्च, चैत्यभूमी आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या येथून जातो.

रोड सिग्नलवर महिलांचे चिन्ह देणारे मुंबई हे भारतातील पहिले शहर ठरले आहे. भारताबाहेर जर्मनी, नेदरलँड्स, स्विर्त्झलँडमधील जिनिव्हा येथे आधीपासूनच सिग्नलवर महिलांचे चिन्ह देण्यात आलेले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये २०१७ पासून लिंगभेद मिटवून लिंग समानता आणण्यासाठी अशाप्रकारचे सिग्नल बसविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -