घरमुंबईबंदबाबत पोलीस संभ्रमात

बंदबाबत पोलीस संभ्रमात

Subscribe

मुंबईत बंद आहे किंवा कसे याची माहिती देणारा कोणीही आंदोलक नेता पुढे आलेला नाही. यामुळे गृहखात्याने बंदोबस्तासाठी केंद्रिय राखीव दलाच्या १४ तुकड्या मुंबईत मागवल्या होत्या. आता सात तुकड्या मुंबईत तैनात करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

१४  ऐवजी ७ तुकड्या मुंबईत दाखल

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने झाल्यानंतर २५ जुलै रोजी मुंबई, नवी मुंबई , ठाणे, रायगड या ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. हा बंद हिंसक झाल्याने उद्या ९ ऑगस्ट रोजी होणार्‍या बंदवरून पोलीस संभ्रमात आहेत. मुंबईत बंद आहे किंवा कसे याची माहिती देणारा कोणीही आंदोलक नेता पुढे आलेला नाही. यामुळे गृहखात्याने बंदोबस्तासाठी केंद्रिय राखीव दलाच्या १४ तुकड्या मुंबईत मागवल्या होत्या. आता सात तुकड्या मुंबईत तैनात करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

कशा आहेत या स्पेशल फोर्स?
मराठा आंदोलन हिंसक होईल म्हणून केंद्र सरकारतर्फे एकूण १४ स्पेशल फोर्स पाठवण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण उद्याच्या आंदोलनाला फक्त ७ फोर्स येणार असल्याची माहिती पोलीस खात्यातर्फे देण्यात आली आहे. मुंबई वगळून आंदोलन पुकारले जाणार असल्याने आधी आंदोलनाच्या तीव्रतेबाबत फारशी चिंता नव्हती. मात्र ठाणे, नवी मुंबई, चाकण, नाशिक येथे आंदोलकांनी कायदा हाती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुठलीही घटना घडायला नको, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याकरताच केंद्रिय राखीव दलाच्या १४ टीम्स मुंबईत मागवण्यात आल्या होत्या. मात्र मुंबई वगळून बंद असल्याचे जाहीर करण्यात आल्याने ७ तुकड्या बोलवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. एका टीममध्ये जवळपास १०० ते ११० या संख्येने शस्त्रधारी जवानांचा समावेश असतो. एकूण ७ टीममध्ये जवळपास ८०० जवानांचा समावेश असून उद्या या स्पेशल फोर्स मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान काही ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. त्यामुळे ९ऑगस्टला होणार्‍या आंदोलनाचा विचार करून १४  राखीव तुकड्या बोलवण्यात येणार होत्या. आता सात तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत. यात ८०० शस्त्रधारी जवानांचा समावेश असेल. पोलीस खात्यातर्फे काही विभाग निवडले आहेत जिथे आम्ही ही फोर्स तैनात केलीय.
– अनुप कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक, महासंचालक कार्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -