घरमनोरंजनश्रावणी शुक्रवार : बिग बींनी केले विठ्ठल रखुमाईचे स्मरण

श्रावणी शुक्रवार : बिग बींनी केले विठ्ठल रखुमाईचे स्मरण

Subscribe

बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन नुकतेच कोरोनासारख्या आजारातून बरे होऊ घरी आले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असून आजच्या श्रावणी शुक्रवारी बिग बींनी देवाच्या प्रतिमेची पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन यांनी पंढरीच्या विठ्ठल रखुमाईचे फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले असून सोबत रामाचे दोहे लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम कीनह चाहें सो होई, करें अन्यथा कछु नहीं होई…, म्हणजे रामाच्या मनात जे आहे तेच होणार आहे. त्याच्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि ८ वर्षांची नात आराध्या यांनाही कोरोना झाला होता. दरम्यान, ऐश्वर्या आणि आराध्या यांना आधी हॉस्पिटलमधून बरे झाल्यावर सोडण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र अभिषेक बच्चन अजूनही नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या काळात देशभरातून अमिताभ बच्चन यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या. त्या सर्वांचे बिग बी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले.

हेही वाचा –

Unlock 3 : मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका; ज्येष्ठ कलाकारांना दिली शूटींगची परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -