घरदेश-विदेशलव मॅरेज केल्याने तरुणीला विवस्त्र करुन बेदम मारहाण; खाप पंचायतीचे तुगलकी फर्मान!

लव मॅरेज केल्याने तरुणीला विवस्त्र करुन बेदम मारहाण; खाप पंचायतीचे तुगलकी फर्मान!

Subscribe

पंचायत सुरू असताना तरूणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर तिला सुनसान झाडीत फेकले

राजस्थानच्या बांसवाड़ामध्ये कायदा पाळत खाप पंचायतीत असे काही घडले की, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका तरुणीला तिच्या प्रियकराशी लग्न करणं खूप महागात पडले आहे. प्रेमविवाहाच्या रागाने खाप पंचायतीत तरुणीला जाहीरपणे विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीला मारहान केल्यानंतर ही पंचायतीत उपस्थित लोकांचे समाधान झाले नाही तेव्हा लग्नासाठी १५ लाख रुपयांचे फर्मान त्यांनी त्या तरूणीला दिले. हा दंड वसूल करताना या तरूणीला लोकांनी घरातून फरपटत बाहेर काढले आणि यावेळी तिचे कपडे देखील फाडले.

पंचायत सुरू असताना तरूणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर तिला सुनसान झाडीत फेकले आणि लोक तेथून निघून गेले. ग्रामस्थांनी त्याचा एक व्हिडिओ बनविला, त्यानंतर तो व्हायरल झाला. त्यावेळी जिल्हा विधी सेवा सचिवांकडे ही माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील एसपीला या प्रकरणाची माहिती दिली.

- Advertisement -

एसपीच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. तरूणीच्या प्रेमविवाहामुळे गावातील लोक संतापले होते. मुलीचे लग्न गावच्याच मुलाशी झाले आहे, असे या घटनेविषयी सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर या घटनेतील सर्व आरोपी पळून गेले, ज्यांना पोलिसांनी पकडण्यासाठी अनेक ठिकाणी तपासणी चौकशी करून शिक्षा दिली आहे , असे सांगितले जात आहे.


एकाच कुटुंबातील चौघांची हत्या 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -