घरताज्या घडामोडीवर्षाला दहा ‘Period Leave’, महिलांच्या आरोग्यासाठी कंपनीने घेतला निर्णय

वर्षाला दहा ‘Period Leave’, महिलांच्या आरोग्यासाठी कंपनीने घेतला निर्णय

Subscribe

मासिक पाळीदरम्यान महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मासिक पाळीदरम्यान असणारे गैरसमज आणि हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्यामुळे झोमॅटो कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने काम करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला दहा पिरिएड्स लिव्ह म्हणजे मासिक पाळीच्या सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

झोमॅटो कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष दिपेंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना शनिवारी या संदर्भातील इमेल पाठवले आहेत. या मेलमध्ये म्हटलं होतं की, “पिरिएड लिव्हसाठी अर्ज करताना लाज वाटण्यासारखं काहीच नाहीय. माझे पिरिएड्स सुरु आहेत मला सुट्टी हवी आहे असं तुम्ही इंटरनल ग्रुपवर किंवा इमेलवर मोकळेपणे यासंदर्भात सांगितलं पाहिजे,”

- Advertisement -

इमेलमध्ये पुरूषांसाठी देखील एक खास संदेश आहे. त्यात म्हटलय, “पुरुषांसाठी एक सांगू इच्छितो की आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांची मासिक पाळी सुरु आहे सांगताना अवघडल्यासारखे वाटू नये. हा आयुष्याचा एक भाग आहे. या दिवसांमध्ये महिलांना काय काय त्रास सहन करावा लागतो याचा आपल्याला पूर्णपणे अंदाज बांधता येत नाही. मात्र जेव्हा त्या मला या काळात आराम करायला हवा असं म्हणतात तेव्हा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मासिक पाळीच्या काळामध्ये पोटात दुखण्याची समस्या अनेक महिलांसाठी खूप त्रासदायक असते याची मला कल्पना आहे.” असं गोयल यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.

सुट्ट्यांचा चुकीचा वापर नको

मासिक पाळीसाठी या सुट्ट्या देण्यात आल्या असल्याने त्या इतर कामांसाठी वापरु नयेत असंही कंपनीने म्हटलं आहे. “या सुट्ट्यांचा अपमान करु नका. तुम्ही उरलेली काम करण्यासाठी या सुट्ट्या वापरु नका. शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी या सुट्ट्या वापरा,” असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Video : सुशांतच्या घरातली पुजा, रिया मात्र गायब, पुजारींनी केला महत्वाच्या गोष्टीचा खुलासा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -