घरदेश-विदेशरेल्वचे ते पत्रक खोट; पुढील आदेशपर्यंत रेल्वे सेवा बंदच

रेल्वचे ते पत्रक खोट; पुढील आदेशपर्यंत रेल्वे सेवा बंदच

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्सप्रेस, प्रवासी वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केलेली आहे. मात्र आता या निर्णयाला मुदत वाढ मिळाली असल्याची चर्चा होत आहे. त्यासंबंधी एक पत्रकसुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. परंतू या पत्रातील माहितीत तथ्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून  सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे सुरक्षेच्या कारणावरून २२ मार्चपासून देशातील रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यानंतर रेल्वे बोर्डाने १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, मेट्रो, लोकल ट्रेन आणि ईएमयूची वाहतूक बंदच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र १ मे पासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन, १२ मे पासून देशातील निवडक १५ मार्गावर राजधानी स्पेशल ट्रेन आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जूनपासून मर्यादित लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला अत्यावश्यक कर्मचार्‍यांकरता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला ७५० पेक्षा जास्त फेर्‍या चालवण्यात येत आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे १ जुलै ते १२ ऑगस्ट २०२० पर्यंत प्रवाशांनी बुक केलेली सर्व रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. मात्र आता मात्र ३० सप्टेंबरपर्यंत मेल, एक्स्प्रेस आणि लोकल बंद राहणार आहे. अशा आशयाचे पत्रक समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात पडल होते. तसेच रेल्वे विभागातसुद्धा गोंधळ उडाला होता. परंतू या पत्रातील माहितीत तथ्य नसल्याचे स्वतः रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आले आहे. तसेच १२ मे पासून स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या २५० स्पेशल ट्रेन्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. शिवाय पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष लोकल सेवा सुरुच राहणार आहेत.

हेही वाचा –

कामाठीपुर्‍यात अनलॉकसाठी ‘लालबत्ती’! हजारो रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -