घरठाणे15 ऑगस्टनंतर ठाण्यातील सर्व आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय

15 ऑगस्टनंतर ठाण्यातील सर्व आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय

Subscribe

कोरोना कोविड 19 चे संकट अद्यापही टळलेले नाही. ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. 15 ऑगस्टनंतर शहरातील पी वन आणि पी टू नुसार जी आस्थापने सुरू होती ती सर्व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्रौ 7.00 पर्यंत सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केट्स, जिम, स्वीमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाईम स्लॉट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोना कोविड 19 ची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे यांनी कोरोना कोविड 19 चे संकट अद्यापही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी प्रत्येकाचा जीव वाचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे या कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, दुकानांमध्ये काम करणार्‍या सर्वांची चाचणी करणे याबाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. असे सांगून राज्य शासनाने, तसेच महापालिका प्रशासनाने ज्या अटी आणि शर्थी घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापार्‍यांची असेल, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -