घरCORONA UPDATEधक्कादायक! मुंबईत ११,२८७ रुग्ण Positive, मात्र कोणतेही Symptoms नाहीत!

धक्कादायक! मुंबईत ११,२८७ रुग्ण Positive, मात्र कोणतेही Symptoms नाहीत!

Subscribe

देशाभरासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असून राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. मात्र त्यापैकी मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई सारख्या शहरात कोरोनाचा वाढता फैलाव अटोक्यात येत आहे. मात्र मुंबईत कोरोनासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ११ हजार २८७ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे लक्षणं दिसून आले नाहीत. असे असले तरी त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील बाधितांचा आकडा ७ लाखांपार

मुंबईमध्ये सध्या १८ हजार २६३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर १ लाख ११ हजार ८४ जणांनी कोरोनाला हरवले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२९ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

देशात २४ तासात कोरोनाचे ६७ हजार १५१ नवे रूग्ण

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMR चे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. दररोज जगातील सर्वात नवीन कोरोनाचे रुग्ण भारतात आढळले येत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३२ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ६७ हजार १५१ नवे रूग्ण आढळले असून १ हजार ५९ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


कोरोनाचा फैलाव झाला कमी; १२ दिवसात १ कोटी कोरोना टेस्ट: आरोग्य मंत्रालयाचा दावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -