घरट्रेंडिंगअसली कसली हौस? बॉडी मॉडिफिकेशनसाठी कान कापून बरणीत ठेवले!

असली कसली हौस? बॉडी मॉडिफिकेशनसाठी कान कापून बरणीत ठेवले!

Subscribe

आपल्या शरीरावर टॅटू गोंदवून घेण्याची हौस अनेकांना असते. अजूनही टॅटूचं फॅड तरुणांसोबतच सर्वच वयोगटातल्या लोकांमध्ये आहे. पण टॅटूही कमी पडला म्हणून की काय, एका माणसाने Body Modification च्या नावाखाली स्वत:चेच कान कापून टाकले. बरं त्याची आठवण राहावी, म्हणून हे कान फेकून न देता बरणीत शोपीस म्हणून ठेवले आहेत! एवढंच नाही, तर आजपर्यंत या महाभागाने आपल्या बॉडी मॉडिफिकेशनसाठी १७ सर्जरी केल्या असून त्यासाठी ६ लाख रुपये खर्च केले आहेत. Mr. Skull Face या नावानं हा माणूस सोशल मीडियावर परिचित असून अशा चित्र-विचित्र सर्जरींमुळे कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा लुक भलताच व्हायरल होत आहे.

Mr. Skull Face

- Advertisement -

या माणसाचं खरं नाव आहे सँड्रो! मूळचा जर्मनीचा असलेल्या ३९ वर्षीय सँड्रोला पहिल्यापासूनच Body Modification चा छंद होता. म्हणजेच आपल्या शरीरात सर्जरी करून वेगवेगळे बदल करून घ्यायचा छंद. या छंदापायी त्यानं आपलं कपाळ, हात आणि जिभेवर अनेक सर्जरी करून घेतल्या आहेत. २०१९मध्ये त्याचं हे वेड इतकं टोकाला गेलं की त्यानं आपले कानच सर्जरी करून काढून टाकले. सँड्रोचं असं म्हणणं आहे की त्याच्या शरीरात तो करत असलेले बदल त्याच्या आयुष्यातही परावर्तित होतात. त्यामागे ‘कूल’ वगैरे दिसण्याचा कोणताही हेतू नाही.

- Advertisement -

सँड्रो म्हणतो, ‘माझ्या शरीरात मी केलेले बदल माझ्या आयुष्यावर देखील परिणाम करतात. पण मला फरक पडत नाही. लोकांनी माझा स्वीकार एक व्यक्ती म्हणून करावा. माझ्या तत्वांसाठी करावा. माझ्या या लुकमुळे मला जॉब मिळणं देखील कठीण झालेलं आहे. कारण अनेक कंपन्या अजूनही त्याच साचेबद्ध पद्धतीने विचार करतात. लोकं माझ्या लुकसाठी माझ्यावर टीका करतात त्याचा मला फरक पडत नाही. माझा लुक अनेकदा लोकांना घाबरवतो. पण काहींना तो इंटरेस्टिंग देखील वाटतो. यातूत मी मानसिक रित्या अजूनच सक्षम होतो’.

आत्तापर्यंत सँड्रोनं १७ सर्जरी केल्या आहेत. त्याच्या शरीरावर असंख्य टॅटू गोंदवले आहेत. गेल्या वर्षी त्यानं आपले कान काढून टाकले आहेत. आता त्याचं पुढचं टार्गेट त्याच्या नाकाचा पुढचा शेंडा काढून टाकण्याचं आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -