घरCORONA UPDATE'ते २१ दिवस आव्हानात्मक होते'; कोरोनावर मात केल्यानंतर जेनेलिया देशमुखची पोस्ट!

‘ते २१ दिवस आव्हानात्मक होते’; कोरोनावर मात केल्यानंतर जेनेलिया देशमुखची पोस्ट!

Subscribe

दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोना व्हायरसची लागण एकदी सामान्यांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत झाली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या यानंतर आता अभिनेत्री जेनेलिया डिसूझाला कोरोनाची लागण होती असं समोर आलं आहे. मात्र जेनेलियाने २१ दिवसात कोरोनावर विजय मिळवला. रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे.  स्वस्थ आहे. याविषयी अभिनेत्रीने स्वत: च ट्विट करून माहिती दिली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री जेनेलिया डिसोझाने तिच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने म्हटलं आहे की, “तीन आठवड्यांपूर्वी माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. गेल्या २१ दिवसांपासून माझ्यात कोणीतच लक्षणे नव्हती. देवाच्या कृपेने आज माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. हे २१ दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. आपण डिजीटली एकमेकांशी कितीही कनेक्ट असलो तरी तुम्हाला कायम एकटेपण जाणवते. मी आज २१ दिवसांनंतर आपल्या कुटुंबात परत आल्यामुळे खूप खूष आहे. तुम्हीपण तुमच्या आवडत्या माणसांच्या सानिध्यात रहा जेणेकर तुमच्यात वेगळी शक्ती येईल. काण अंगात ताकद येण्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचं असतं.

पुढे तीने असही म्हटलं आहे की, तुम्ही पण कोरोना टेस्ट करून घ्या, स्वस्थ रहा, चांगल खा. म्हणजे या कोरोनारूपी राक्षसाला सहज हरवता येईल. जेनेलियाच्या या ट्विटवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- धक्कादायक! मासे पकडायला गेलेल्या सख्ख्या भावांचा आईसमोरच बुडून मृत्यू!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -