घरदेश-विदेशडिलिव्हरीचं बिल भरणं शक्य नसल्याने आई-वडिलांनी विकलं आपल्या नवजात बालकाला!

डिलिव्हरीचं बिल भरणं शक्य नसल्याने आई-वडिलांनी विकलं आपल्या नवजात बालकाला!

Subscribe

आरोग्य विभागाने रुग्णालय केले सील

माणुसकीला लाजवेल अशी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आली आहे. एका रुग्णालयात गरीब रिक्षाचालकाला डिलिव्हरी बिल भरता येणं शक्य झालं नाही म्हणून देवासमान मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी नवजात बालकाला एक लाखात विकले. हॉस्पिटलमधील डिलिव्हरी बिल ३० हजार रुपये झाले होते. मात्र या दाम्प्त्याला ते देणं गरिबीमुळे शक्य झाले नाही, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी बालकाचा सौदा केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवजात मुलाची विक्री झाल्याची बातमी समजताच आरोपी दिलीप मंगल यांनी मुलाला गरीब जोडप्याकडे सुपूर्द केले. आपल्या पोटच्या मुलाला पुन्हा हातात घेतल्यावर या गरिब जोडप्याचे डोळे भरून गेले. प्रशासनाने या प्रकरणी कारवाई करताना रुग्णालयाला सील केले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

शंभू नगर येथे राहणारा शिवनारायण रिक्षा चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद होते. कर्ज भरण्यासाठी त्याने आपले घरही विकले होते. २४ ऑगस्टला शंभूची पत्नी बबिता यांना प्रसूती कळा सुरू झाल्यात. त्यानंतर त्याने जेपी रुग्णालयात पत्नीला दाखल केले. त्या महिलेने एका मुलाला जन्म दिला. परंतु रुग्णालयाने ३५ हजार रुपयांचे बिल दिले. मात्र ते देणे शक्य नसल्याने गरीब जोडप्याचा रुग्णालयाकडून अनादर करण्यात आला, यावेळी त्यांनी हात पाय जोडले आणि ५०० रुपये असल्याचे सांगितले. पण कोणी त्याचे ऐकले नाही.

डॉक्टरांनी या गरीब जोडप्याला धमकावले आणि एका कागदावर जबरदस्तीने अंगठा घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी मुलासाठी दहा लाख रुपयांची किंमत ठरवून शंभू आणि त्याच्या पत्नीला काही पैसे देऊन पळवून लावले. आरोग्य विभागाला या घटनेची माहिती मिळताच कारवाई करत रुग्णालयावर छापा टाकून ते सील केले. सीएमओ डॉक्टर आरसी पांडे यांनी सांगितले की, नवजात मुलाची विक्री केल्याचा अहवाल आहे. पोलिस याची चौकशी करतील.


कडवा कालव्यात एक वर्षाच्या बाळाचा मृतदेह
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -