कडवा कालव्यात एक वर्षाच्या बाळाचा मृतदेह

navi mumbai bar dancer thief caught while stealing child

नाशिकरोड । चांदगिरी गावाच्या शिवारातील कडवा कालव्यात बुधवारी (दि.२) सकाळी सहा वाजता एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक तालुक्यातील चांदगिरी गावाच्या शिवारातून जाणा-या कडवा कालव्याला सध्या आवर्तन सोडलेले आहे. येथील काही करिअर अॅकेडमीतील काही युवक बुधवारी सकाळी या मार्गाने सराव करत असतांना त्यांना पाण्यावर एक बालक तरंगतांना दिसले. त्यांनी त्यास बाहेर काढून पोलीस पाटील लखन कटाळे यांना कळविले. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील हवालदार अर्जुन गांगुर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.