घरताज्या घडामोडीसविनय कायदेभंग प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ मनसे नेत्यांना अटक!

सविनय कायदेभंग प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ मनसे नेत्यांना अटक!

Subscribe

कोरोना काळात सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईची लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न खरंतर मुंबईतल्या प्रत्येकालाच पडला आहे. सध्या मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत यांच्यासह काही मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईच्या लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करण्याचं जाहीर केलं होतं. त्याबद्दल पोलिसांनी संदीप देशपांडेंना नोटीसही बजावली होती. मात्र, तरीदेखील त्यांनी सोमवारी सकाळी लोकलने प्रवास केला. काळी त्यांनी शेलू ते कर्जत असा लोकलने प्रवास केल्यानंतर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद आहे. मात्र, अनलॉक सुरू झाल्यापासून सर्वच व्यवसाय आणि उद्योगधंदे यांच्यासोबत ऑफिसेस देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लोकल नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. बेस्ट आणि एसटीने यासाठी जादा गाड्या सोडून काही प्रमाणात नक्कीच दिलासा दिला आहे. मात्र, तरीदेखील या गाड्यांना होणारी गर्दी आणि लागणारा वेळ यांचं गुणोत्तर मुंबई लोकलशी अजिबात जुळत नसल्यामुळे रोज ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

दरम्यान, लोकल सुरू करावी ही मागणी अनेक समाजघटकांसोबतच मनसेने देखील लावून धरली आहे. त्याचसाठी हा सविनय कायदेभंग मनसेकडून करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -