घरताज्या घडामोडीबेस्टच्या मदतीला धावून आली लालपरी

बेस्टच्या मदतीला धावून आली लालपरी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट बसेसवर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात तान आलेला असून प्रवाशांना खचाखच भरलेल्या बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. तसेच बसबाहेर लटकून प्रवास करणार्‍या मुंबईकरांचा आता प्रवास सुखकर व्हावा, म्हणून बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाच्या एक हजार बसेस उपक्रमात भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील भाडेतत्वावरील ७६ बसेस मुंबईकरांचा सेवेत गुरुवापासून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सर्व सामान्य मुंबईकरांची उपनगरी लोकल सेवा बंद आहे. राज्य सरकारने जेव्हा पुनश्च हरिओमची घोषणा केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाहीत. त्यामुळे प्रवाशांना फक्त बेस्टचा बसेसवर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बस असून त्यापैकी ३,२०० ते ३,३०० इतक्या बस चालविल्या जातात. तरीही बसमध्ये होणारी प्रवाशांची संख्या पाहता त्या सेवा अपुर्‍या ठरत आहेत. तसेच बेस्ट बसेससाठी गर्दीच्या वेळी प्रवाशांना अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. सकाळी कार्यालयात, तर सायंकाळी घरी पोहचण्यास विलंब होत असल्याने चाकरमानी बेस्ट वाहकांना न जुमानता बसेसमध्ये गर्दी करून प्रवास करत आहेत. काही प्रकरणांत वाहकांना शिवीगाळ आणि मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच बसमधील गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन केले जात नाही. परिणामी प्रवाशांमध्ये कोरोनाची धास्ती वाढते आहे. यामुळे राज्य सरकारने एसटीकडील १ हजार बसचा ताफा मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्याची घोषणा नुकतीच केली. त्यानुसार एसटीच्या ७३ बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

१ हजार बसेस भाडेतत्वावर

सध्या बेस्टच्या मुंबई आणि उपनगरात ३,२०० इतक्या बस चालविल्या जातात. त्यामार्फत दररोज १६ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. या सेवांवरील प्रचंड ताण लक्षात घेता राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या १ हजार बसेस भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारातील ७६ एसटी बसेस बेस्टचा ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दाखल झालेल्या एसटी बसेस गुरुवारी दिवसभरात बसमार्ग क्रमांक ४,७,८, ३० आणि जलद सी ७२ या मार्गावर चालविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -