घरताज्या घडामोडीराज्यसभा सचिवालयातील ८३ अधिकारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

राज्यसभा सचिवालयातील ८३ अधिकारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यादरम्यान १० दिवस चालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी संपले. या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा सचिवालयातील ८३ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी एका बैठकीत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी अशी माहिती दिली की, ‘सचिवालयात ८३ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेतृ. राज्यसभा सचिवालयाच्या वतीने त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

कोविड-१९ इंडिया ट्रकरच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात ५८ लाख १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ९२ हजार २७५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच ४७ लाख ४९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ लाख ७९ हजारांहून अधिक Active रुग्ण आहेत. देशात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona In Maharashtra: चिंता कायम! दिवसभरात ४५९ कोरोनाचे बळी, मृत्यूदरही वाढला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -