घरIPL 2020केएल राहुलने शतक ठोकत मोडला सचिनचा विक्रम

केएल राहुलने शतक ठोकत मोडला सचिनचा विक्रम

Subscribe

किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने तुफानी शतकी खेळीसह अनेक विक्रम केले. केएल राहुलने आयपीएल २०२० मधईल पहिलं शतक झळकावत आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारा तो वेगवान भारतीय खेळाडूही ठरला. त्याचबरोबर त्याच्या स्फोटक खेळीसह तो आयपीएलमधील डावात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.

वेगवान २००० धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. संपूर्ण स्पर्धेतील खेळाडूंमध्ये हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ४८ डावात २००० धावा पूर्ण केल्या. राहुलने ६० डावात २००० धावा पूर्ण केल्या. यासह आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. यापूर्वी कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरने एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना वॉर्नरने आयपीएल २०१७ मध्ये १२६ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

राहुलने आयपीएल २०२० मधील पहिलं शतकही ठोकलं. राहुलने ६९ चेंडूत १३२ धावांची विशाल खेळी खेळली. आजच्या सामन्यात राहुलला दोनदा जीवदान मिळालं. विराट कोहलीने १६ व्या आणि १७ व्या षटकात दोनदा झेल सोडला. राहुल तेव्हा ८३ आणि ८९ धावांवर होता. राहुलने या खेळीत १४ चौकार आणि ७ षटकार लगावले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -