घरताज्या घडामोडीफेकून दिलेला काचेचा तुकडा निघाला हिरा; किंमत तर बघा

फेकून दिलेला काचेचा तुकडा निघाला हिरा; किंमत तर बघा

Subscribe

अमेरिकेतील एका पार्कमध्ये फिरत असलेल्या व्यक्तीला एक काचेचा तुकडा दिसला. मात्र, तो काचेचा तुकडा नसून हिरा असल्याचे समोर आले आहे.

कधी कोणाचे नशिब पलटेल हे काय सांगता येत नाही. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेतील एका पार्कमध्ये फिरत असलेल्या व्यक्तीला एक काचेचा तुकडा दिसला. मात्र, तो काचेचा तुकडा नसून हिरा असल्याचे समोर आले आहे. या काचेच्या तुकड्याची तपासणी केल्यानंतर हा ९.०७ कॅरेटचा हिरा असल्याचे समोर आले असून आर्कान्सा स्टेट पार्कच्या वृत्तानुसार, हा हिरा ४८ वर्षांच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा असल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

अमेरिकेत राहणारे केव्हिन हे एका बँकचे मॅनेजर असून ते त्यांच्या मित्रासोबत होलीड मुरफ्रीसबोरो या पार्कमध्ये गेले होते. त्या दरम्यान, केव्हिन यांना एक काचेचा तुकडा दिसला. सर्वप्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सांगितले की, ते बराच काळ पार्कच्या डिस्कव्हरी सेंटरमध्ये थांबले होते. त्या दरम्यान पार्कचे कर्मचारी लोकांना सापडलेल्या वस्तूंची नोंदणी करत होते. मात्र, केव्हिनला ही काच वाटत असल्यामुळे त्याने याची नोंद केली नाही. परंतु, ज्यावेळी त्यांचे समान तपासण्यात आले त्यावेळी हा काचेचा तुकडा समोर आला. महत्त्वाचे म्हणजे हा काचेचा तुकडा नसून हिरा असल्याचे समोर आले. या हिऱ्याची किंमत तब्बल १ ते ५ कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

२० ऑगस्ट रोजी स्ट्रॉम लोरा संशोधनासाठी ठेवण्यात आला होता. मात्र, ७ सप्टेंबर रोजी केव्हिनला एक चमकणारा हिरा सापडला. बुधवारीपर्यंत डायमंड्स स्टेट पार्क येथे यंदा २४६ हिरे नोंदविण्यात आले असून एकूण ५९.२५ कॅरेट वजनाचे हिरे नोंदविण्यात आले आहेत. सरासरी लोकांना दररोज एक किंवा दोन हिरे सापडतात.  – ड्र्यू एडमंड; उद्यानाचे सहाय्यक अधीक्षक

- Advertisement -

हेही वाचा – खुशखबर! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -