घरCORONA UPDATEधक्कादायक; कोरोनामुळे मुंबई मनपाच्या २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू

धक्कादायक; कोरोनामुळे मुंबई मनपाच्या २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे कोविड योद्धे म्हणून काम करत आहेत. मात्र या लढाईत अनेक योद्धांचा बळी गेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर २०० कर्मचाऱ्यांचा या लढाईत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यापैकी अनेक कर्मचारी हे चतुर्थ श्रेणी गटातील आहेत.

मृतांमध्ये महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांचा अधिक भरणा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच घनकचरा विभाग, आरोग्य, फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभागातील कर्मचारी देखील कोरोना विषाणूला बळी पडले आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स’च्या कार्यक्रमात मृत्यूच्या आकडेवारीचा हा आकडा दिला आहे, अशी माहिती लोकसत्ता संकेतस्थळाने दिली आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १३४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र मागच्या १५ दिवसांतच मृत्यूच्या संख्येने २०० चा आकडा गाठल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत १ लाख ९६ हजार ५८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ८ हजार ७५० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून महापालिकेचे कर्मचारी संक्रमण रोखण्यासाठी कार्यरत होते. यामुळे अनेक कर्मचारी हे सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतरही संसर्गाचा हा वेग कायम राहिला. अत्यावश्यक सेवेत महापालिका येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे महापालिकेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी आणि इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिपाई यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -