घरदेश-विदेशzoom मीटिंगमध्ये गर्लफ्रेंडला नको तिथं केल किस, नेत्याला द्यावा लागला राजीनामा

zoom मीटिंगमध्ये गर्लफ्रेंडला नको तिथं केल किस, नेत्याला द्यावा लागला राजीनामा

Subscribe

अर्जेंटीनाच्या राजकीय नेत्याचा झूमवरील गर्लफ्रेंडसोबतचा किसिंग व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आपल्या गर्लफ्रेंडला मांडीवर घेऊन बसलेल्या नेत्याने सर्व भान सोडत अस काही केल की सगळ्या झूमवरील सहभागी इतरांना ते नेमक काय सुरू आहे हेच थोड्या वेळासाठी कळेना. अर्जेंटिनाचे राजकीय नेते असलेल्या ज्युएन एमिलो अमेरी यांनी आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र राजीनामा दिला आहे.

काय प्रकार घडला ?

एका पेंशन फंड इनव्हेस्टमेंटच्या व्हर्च्युअल डिबेटमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पण घरातले इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसल्यानेच त्यांनी आपण मिटिंगमधून बाहेर पडलो आहोत असे समजून कॅमेरा ऑफ झाला असे गृहित धरले. पण प्रत्यक्षात हे झूम मिटिंगमधून आऊट झाले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांनी घरातच गर्लफ्रेंडला मांडीवर बसवले. त्यानंतर तिचा ब्लॅक टॉप खाली खेचला. माझ्या गर्लफ्रेंडने ही नुकतेच ब्रेस्ट इनप्लांट सर्जरी केली होती. त्यामुळे ब्रेस्ट कसे दिसतात म्हणून मी टॉप खाली खेचला. ती माझ्या शेजारीच बसली होती. मी तिझ्या ब्रेस्टला किस केले. पण हे सगळे ऑन कॅमेरा सुरू होते याची मला माहिती नव्हती. पण त्यांच्याकडून घडलेल्या अशा प्रकारामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. आम्ही अशा स्वरूपाचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही असे सरकारकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात नमुद करण्यात आले आहे. सध्या जगभरात अनेक सरकारचे कारभार हे व्हर्च्युअल माध्यमातून सुरू आहेत. याआधीही आर्यलंडच्या कायदे मंत्र्याने मिटिंगच्या काळात ट्राऊजर न घालताच मिटिंग अटेंड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

- Advertisement -

पेंशन फंड इनव्हेस्टमेंट या विषयावर व्हर्च्युअल डिबेट सुरू असताना अर्जेंटिनाच्या झूम मिटिंगमध्ये हा किसिंगचा प्रकार घडला आहे. अर्जेंटीनाच्या खालच्या सभागृहातील कॉंग्रेसमध्ये ज्युएन एमिलो अमेरी लोक प्रतिनिधी आहेत. अर्जेटीनाच्या युट्युब चॅनेलवर तसेच व्हर्च्युअल डिबेटसाठी मोठ्या स्क्रिनवर हा किसिंगचा प्रकार समोर केला आहे. सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या महामारीच्या निमित्ताने हे व्हर्च्युअल सेशल ठेवण्यात आले होते. कॉंग्रेसच्या खालच्या सभागृहाने अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक काढत घडलेल्या प्रकारानंतर ज्युएन एमिलो अमेरी यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. ज्युएन एमिलो अमेरी हे उत्तरेकडील प्रांत असलेल्या साल्टामधून निवडून आलेले लोक प्रतिनिधी होते. पेरोनिस्ट पार्टीकडून त्यांनी निवडणुक लढवली होती.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -