घरफिचर्सअटल ‘अक्षरानुभव’

अटल ‘अक्षरानुभव’

Subscribe

‘अक्षरानुभव’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाला 2008 साली ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर झाला आणि मग दिल्लीला जायचं ठरलं. आपलं पुस्तक देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कसं देता येईल, याचा विचार करत होतो. एवढ्या लहानशा गोष्टीसाठी देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला वेळ देता येईल का? विचार सुरू झाला... कोण माणूस हे काम करू शकेल...

‘अक्षरानुभव’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाला 2008 साली ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर झाला आणि मग दिल्लीला जायचं ठरलं. आपलं पुस्तक देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कसं देता येईल, याचा विचार करत होतो. एवढ्या लहानशा गोष्टीसाठी देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला वेळ देता येईल का? विचार सुरू झाला… कोण माणूस हे काम करू शकेल… त्यावेळी मी जनकल्याण बँकेचं जाहिरातीचं काम करीत होतो. मॅनेजर सतिश मराठे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी माझं राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं आणि पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करूया असे म्हणाले. सायन येथे राहणारे खासदार गोयल यांच्या कानावर त्यांनी ही गोष्ट घातली. त्यावेळी सुरू असलेल्या कारगिल युद्धाचं कारण सांगून त्यांनी भेटीची शक्यता कमी आहे पण पुस्तक त्यांच्यापर्यंत नक्की पहोचवितो… असा निरोप त्यांनी दिला. भारतीय लिप्या आणि भारतीय सुलेखनावर आधारीत पुस्तक त्यांच्यासारख्या माणसाच्या हातात जावं एवढीच इच्छा… पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीला पोहचलो… गोयलांचा निरोप आला की भेटणं शक्य नाही… तुमचं पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहचविलं.

मी महाराष्ट्र सदनात उतरणार असल्याने काय निरोप आहे का अशी चौकशी केली. दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर फिरायला निघणार इतक्यात फोनची बेल वाजली, ‘‘आपका नाम अच्युत पालव है क्या?’’ दोन मिनीटं घाबरून गेलो, माझी तत -फफ झाली पण लगेचच समोरच्या माणसाने ‘हम पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजीके ऑफिससे बोल रहा हूं। आप 11 बजे आ जाईए। वाजपेयी साहब आपको मिलनेवाले है।’… बस… आनंद गगनात मावेनासा झाला… माझ्याबरोबर माझा मित्र राजन बागवे, प्रकाश शिर्के आणि माझं कुटुंब होतं. सगळ्यांना सांगितलं की 11 वा. पंतप्रधानांना भेटायचं त्यांनी वेळ दिली आहे. क्षणभर कोणालाच खरं वाटत नव्हतं पण सत्य होतं.

- Advertisement -

अखेर पंतप्रधान निवास स्थानी पोहोचलो, भली मोठी रांग. कारगिल युद्ध चालू होत त्यामुळे आलेला प्रत्येक जण देशाला मदत करण्याच्या उद्देशाने आला होता. सगळ्यात शेटी माझा नंबर होता, अखेर ती वेळ आली… आत प्रवेश केला खुर्चीत बसलेले पंतप्रधान उठून उभे राहिले आणि पाठ थोपटली. आपने बहुत अच्छा काम किया है…

मग पुस्तकाचं प्रत्येक पान माझ्याकडून समजावून घेत होते. बराच वेळ गेल्यानंतर बाहेरच्या फोटोग्राफर्सनी एकच बोंबाबोंब केली… ‘‘चेक कहा है; वो दिखाईये।’’ मला ही ते कळलं होतं की माझं कौतुक करायला आलोय… माझ्याकडे चेक नव्हता… पुस्तक होतं… शेवटी अटलजी स्वत: पुढे आले आणि त्यांनी प्रेसला सांगितलं की.. ‘इन्होंने ऐसी अनमोल चीज लाई है जिसका मूल्य देने के लिए मेरे पास चेकबुक नही है’ एवढं म्हणताच क्षणभर सगळे चकीत झाले, ‘इन्होंने क्या ऐसा दिया है; जिससे प्रधानमंत्री प्रभावित हुए?’ एकच गराडा माझ्याभोवती पडला… देशाच्या पंतप्रधानाने एवढं आपल्याविषयी बोलावं… राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा तो मोठा पुरस्कार होता… काही बोलता पण येत नव्हतं… इतकं मन भरून आलं होतं… आजही तो क्षण आठवला की विनम्रपणे काम केलेली माणसं कितीही मोठी झाली, तरीही तो आपुलकीचा भाव कायम असतो.

- Advertisement -

पुढे अटलजींच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट काय द्यावी यासाठी माझ्या मित्राला फोन आला. एवढ्या मोठ्या माणसाला सोन्या-नाण्यापेक्षा वेगळं काय देता येईल का? यासाठी त्यांनी मला फोन केला. ताबडतोब मी त्यांना त्यांची एखादी कविता कॅलिग्राफीत करून देऊया… आयडिया त्याला आवडली. त्यांच्या पुस्तकातून ‘गीत नया गाता हूँ’ ही कविता एका कागदावर सुलेखनबद्ध केली आणि फ्रेम करून मित्राकडे दिली. कुतूहलापोटी दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्याला विचारलं की कविता त्यांना आवडली का? मित्राचा फोन आला; कविता पाहिल्यावर इससे अच्छा और क्या हो सकता है! अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, हे कळताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढा मोठा माणूस पण कवी मनाचा, शब्दांवर प्रेम करणारा, शब्दांची फेक कशी असावी हे त्यांच्या कविता ऐकताना जाणवत असे, त्यामुळे माझ्यासारख्या सुलेखनकारासाठी अटलजी हा एक मोठा अनुभव होता, आणि तो तसाच राहणार आहे, अटल…


-अच्युत पालव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -